ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवली; महापालिकेकडून 17 बंगले डिफॉल्टर घोषित

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2020 12:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवली; महापालिकेकडून 17 बंगले डिफॉल्टर घोषित

शहर : मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाची 24 लाख 56 हजार 469 रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला डिफॉल्टर म्हणून घोषित केला आहे. सामान्य मुंबईकरांनी पाणीपट्टी थकवली तर त्यांचे पाणी कापले जाते. त्यामुळे महापालिका मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरही अशीच कारवाई करणार का? असा सवाल केला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 24 लाख 56 हजार 469 रुपयांची थकबाकी थकली आहे. त्यामुळे पाणीपट्टी न भरणाऱ्या या बंगल्यांना मुंबई महापालिकेने डिफॉल्टरच्या यादीत टाकले आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. सामान्य नागरिकांनी पाणीपट्टी भरली नाही तर त्यांची नळजोडणी खंडित केली जाते. त्यामुळे पाणीपट्टी न भरणाऱ्या या बंगल्यांवर महापालिका काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या मंत्र्यांनी पाणीपट्टी थकवली

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयलस्टोन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मेघदूत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुरातन, मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या शिवगिरी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जेतवन, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या चित्रकुट, मंत्री राजेश शिंगणे यांच्या सातपुडा, नवाब मलिक यांच्या मुक्तागिरी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक आणि सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अजंता तसेच सह्याद्री अतिथी गृहाची पाणीपट्टी थकली आहे. या सर्व बंगल्यांची एकूण पाणीपट्टी 24 लाख 56 हजार 469 रुपये एवढी असल्याने पालिकेने त्यांना डिफॉल्टरच्या यादीत टाकले आहे.

पाणीपट्टी भरा: दरेकर

बंगल्यांच्या दुरुस्तीवर उधळपट्टी करणाऱ्या सरकारने थकलेली पाणीपट्टी लवकरात लवकर भरावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. ग्राहकांना अवजवी वीज बिलं पाठवणाऱ्या सरकारने पाणीपट्टी भरावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

 

मागे

मराठा आंदोलनाच्या भीतीने मुंबईच्या वेशीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त, कार्यकर्त्यांना नोटीसा
मराठा आंदोलनाच्या भीतीने मुंबईच्या वेशीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त, कार्यकर्त्यांना नोटीसा

हिवाळी अधिवेशनाची वेळ साधून आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या मराठा आंदो....

अधिक वाचा

पुढे  

कोल्हापूरचे कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचं निधन
कोल्हापूरचे कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचं निधन

भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं कोल्हापुरात निधन झा....

Read more