By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 13, 2019 12:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
'प्रोजेक्ट मुंबई' या संस्थेच्या वतीने टाकाऊ प्लास्टीकपासून साकारण्यात आलेल्या टिकाऊ बाकड्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
प्रोजेक्ट मुंबई या संस्थेतर्फे राबवण्यात आलेल्या 'मुंबई प्लास्टिक रिसाक्लोथॉन मोहीम' अंतर्गत नागरिकांकडून टाकाऊ प्लास्टिक जमा करण्यात आले होते. या प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेले 75 बाकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बसवण्यात येणार आहेत. टाकाऊ प्लास्टिकपासून उपयोगी वस्तू बनवण्यासाठी अशा विविध संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, प्रोजेक्ट मुंबई या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी, या विशिष्ट बाकड्यांची निर्मिती करणाऱ्या दालमीया पॉलीप्रोचे अध्यक्ष आदित्य दालमिया, संस्थेचे संचालक तथा मॉर्गन स्टॅन्लीचे व्यवस्थापकीय संचालक रिदम देसाई आदी उपस्थित होते.
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्....
अधिक वाचा