By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 09:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : pandharpur
आषाढी एकदाशिनिमित मुख्यमंत्र्यांनि सपत्नीक आज विठ्ठलाचे दर्शन घेऊन विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली . मध्यरात्री 2.15 वाजता विट्ठलाच्या पूजेला सुरवात झाली आणि 3 वाजता सांगता झाली. त्यानंतर तीन ते साडे तीन पर्यंत रुक्मिणी मातेची पुजा झाली. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, बळीराजाला सुखी करण्याचं साकड मुख्यमंत्र्यांनी विट्ठलाकडे घातले.महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून जवळपास 15 लाख भाविक विट्ठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहेत.
या पूजेत वारकर्यांचा प्रतींनिधी म्हणून बसण्याचा मान लातूर मधील अहमदपूरचे भाविक विठ्ठल चव्हान आणि प्रयागाबाई चव्हाण या दांपत्याला मिळाला. गेली 20 वर्षे हे दाम्पत्य वारी करीत आहे. महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मंत्री, खासदार व आमदाराचा सत्कार समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
शासनाच्या पर्यावरनाची वारी, पंढरीची वारी या कार्यक्रमाचा समारोप आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुर मधील विश्राम गृहावर पार पडला . यावेळी या संपूर्ण पालखी मार्गावर स्वच्छतेचे अभियान चालविणार्या दिडिकरांचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. स्वच्छतेची गीते सादर केल्यानंतर वारकरी अभंग सुरू होताच मुख्यमंत्र्यांनी इतर वारकर्यासमवेत हातात टाल घेऊन भजनात रंगून गेले. तर त्यांच्या पत्नी अमृता यांनी डोक्यावर तुलसी वृंदावण घेत महिला वारकर्यांमद्धे सामील झाल्या.
याआधी महिला आयोगाकडून आणलेल्या नारी शक्ति या चित्र रथाचा समारोपही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला. त्यानंतर 'नमामी चंद्रभागा' कार्यक्रमांतर्गत जलप्रदूषणाची जंनजागृती करणारा माहितीपट मुख्यमंत्र्यांना दाखविण्यात आला.
मुंबादेवी आणि परिसरचा विकास करण्यासाठी शासनाच्या आर्किटेक मार्फत विकास....
अधिक वाचा