ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उत्तरप्रदेशात थंडीचा कहर, 41 जणांचा मृत्यू 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 11:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

उत्तरप्रदेशात थंडीचा कहर, 41 जणांचा मृत्यू 

शहर : kanpur

        उत्तर प्रदेशात थंडीने आतापर्यंत 41 जणांचा बळी घेतला आहे. तर कानपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.उत्तरप्रदेशात थंडीने कहर केला आहे. दाट धुक्यामुळे रेल्वे आणि विमान उड्डाणांनाही फटका बसला आहे. उत्तर प्रदेशात गुरुवारी कानपूर शहरामध्ये 17, कानपूर ग्रामीणमध्ये 5, झांसीत 4, बांदात व महोबामध्ये प्रत्येकी 3-3 , हातरस, आग्रा, हमीरपूर मध्ये प्रत्येकी 2-2, कन्नौज, चित्रकूट व अलीगडमध्ये प्रत्येकी 1-1 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच वीज कोसळून कानपूरमधील नौबस्ता व कलक्टरगंज परिसरात दोघांचा मृत्यू झाला आहे.

 

         उत्तर प्रदेशात थंडी पडली असून काल सायंकाळी कानपूर, उन्नाव व जालौनमध्ये अवकाळी पाऊस पडला. इटावात 4.8 डिग्री, बांदात 5.4 डिग्रीसह सर्वात जास्त थंडीची नोंद करण्यात आली. काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या पर्वतीय भागांत सतत होणारी बर्फवृष्टी आणि थंड वारे यांमुळे अवघा उत्तर भारत तीन दिवसांपासून पार गारठून गेला आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले असून, अनेक राज्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

मागे

अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार
अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार

         कुर्द कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं इराकमधील बग....

अधिक वाचा

पुढे  

...आणि केरळच्या चित्ररथालाही केंद्र सरकारचा नकार
...आणि केरळच्या चित्ररथालाही केंद्र सरकारचा नकार

         पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रानंतर केरळचा चित्ररथाचा प्रस्ताव ....

Read more