ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सरकारी नोकरीसाठी तरुणांना अनेक प्रकारचे फॉर्म भरुन वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. मात्र, आता तर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2020 09:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सरकारी नोकरीसाठी तरुणांना अनेक प्रकारचे फॉर्म भरुन वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. मात्र, आता तर

शहर : देश

केंद्र सरकारने नोकर भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची घोषणा केली. या निर्णयांमध्ये त्यांनी नोकर भरतीबाबत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.

सरकारी नोकरीसाठी राष्ट्रीय निवड आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या आयोगात नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना रेल्वे, बँक यासारख्या सरकारी नोकऱ्यांसाठी एकच परीक्षा देऊन गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे.

सरकारी नोकरीसाठी तरुणांना अनेक प्रकारचे फॉर्म भरुन वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. मात्र, आता तरुणांना एकच फॉर्म भरुन विवध विभागांसाठी एकच परीक्षा देता येणार आहे. त्यांना फक्त परीक्षेसाठी राष्ट्रीय निवड आयोगामध्ये नाव नोंदणी करावी लागेल. या आयोगाचं मुख्यालय दिल्लीत राहील, अशी माहिती केंद्रीय मंत्री जिंतेद्र सिंह यांनीटीव्ही 9 भारतवर्षसोबत बोलताना दिली आहे.

राष्ट्रीय निवड आयोग कसं काम करणार?

आतापर्यंत एखाद्या उमेदवाराने दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज केला असेल तर त्याला दोन परीक्षा द्याव्या लागायच्या. बऱ्याचदा या दोन्ही विभागांच्या परीक्षा एकाच तारखेला असायच्या. अशावेळी उमेदवाराला कोणत्याही एकाच परीक्षेला बसता यायचं. मात्र, आता राष्ट्रीय निवड आयोगाच्या एका परीक्षेत उमेदवार उत्तीर्ण झाला तर त्याला पुढच्या बँक आणि रेल्वे सारख्या इतर सरकारी नोकरीसाठी परीक्षा देता येईल.

राष्ट्रीय निवड आयोगाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होतील. विशेष म्हणजे राष्ट्रीय निवड आयोगाच्या एकाच परीक्षेचे गुण पाहून उमेदवाराची दुसऱ्या विभागातही निवड होऊ शकते. त्यासाठी उमेदवाराला वेगवेगळे फॉर्म भरण्याती गरज नाही. या नव्या प्रक्रियेमुळे वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल, अशी माहिती जिंतेंद्र सिंह यांनी दिली.

पुढे  

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज (20 ऑगस्ट) सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र तरीही दाभोळकरांचा पर
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज (20 ऑगस्ट) सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र तरीही दाभोळकरांचा पर

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज (20 ऑगस्ट) सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्....

Read more