By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 01:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - 'आज के शिवाजी – नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात प्रकाशित झालेल्या या पुस्तकात मोदी आणि छत्रपती शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरावरून टीका करण्यात येत आहे. गेल्या साडेतीनशे वर्षापासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करण्यात आल्याने त्याबद्दल राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.
दिल्ली भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहले आहे. काल (१२ जानेवारीला) भाजपचे प्रदेशाअध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. लवकरच दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एका धार्मिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
निदान महाराष्ट्र भाजपाने तरी यावर भुमिका सपष्ट करावी.
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही..
एक सुर्य..एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज...छत्रपती शिवाजी महाराज... pic.twitter.com/A2bef0eKWs
जगा च्या अंता पर्येंत दुसरे #छत्रपतीशिवाजीमहाराज होणे नाही
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 12, 2020
-
"आज के शिवाजी नरेंद्र मोदी"
-
पटत नाही मनाला pic.twitter.com/ckEu9e22ZB
भाजपने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केलं ज्यात मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली आहे.ज्या महापुरुषाने आम्हाला आमची ओळख दिली त्यांचा अपमान भाजपने केला. महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.ही तुलना करणं हे बौद्धिक दिवाळखोरीच लक्षण आहे.ह्या प्रवृत्तीचा निषेध. https://t.co/y7Ed3OLXxj
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) January 12, 2020
पुणे - वर्षाच्या सुरुवातीलाच दूध दरवाढीची झळ सामान्य वर्गाला बसली आ....
अधिक वाचा