ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार, फसवणूक केल्याचा आरोप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 21, 2019 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार, फसवणूक केल्याचा आरोप

शहर : मुंबई

एकीकडे राज्यात शिवसेनेकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना, दुसरीकडे शिवसेना नेत्यांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत महासेनाआघाडी करुन, सत्तास्थापन्याच्या वाटाघाटी सुरु केल्या आहेत. त्यालाच तक्रारदाराने आक्षेप घेतला आहे.

महायुतीच्या नावाखाली मते घेतली आणि काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने फसवणूक झाल्याची तक्रार, रत्नाकर भीमराव चौरे यांनी पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांची नावं आहेत. औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महायुतीच्या नावाखाली मते घेतली, पण काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन शिवसेना आमची फसवणूक करत असल्याचं तक्रारदाराने म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी तक्रारदार रत्नाकर भीमराव चौरे यांनी केली आहे.

तक्रारीत नेमकं काय म्हटलं आहे?

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांनी 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान औरंगाबादमध्ये प्रचार केला. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सेना-भाजप महायुतीला मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं. त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने त्यांच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान करुन निवडून दिले.निवडणूक निकालामध्ये भाजप समर्थकांची मते पाहता प्रदीप जैस्वाल निवडून आले. निकालांतर शिवसेनेने भाजपशी युती तोडली आणि महायुतीसोबत सरकारही स्थापन केलं नाही.  त्यामुळे मी भाजप समर्थक आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केलेलं मतदान वाया गेलं. हिंदुत्वाच्या नावे मतं मागून माझी फसवणूक केली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असं रत्नाकर चौरे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. काल काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची तब्बल साडेपाच तास बैठक झाली. काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्व काँग्रेस नेते बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. संध्याकाळी पाचवाजता या बैठकीला सुरुवात झाली. जवळपास साडे पाच तास या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.

मागे

ऊसदर आंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक
ऊसदर आंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाची ठिणगी पडली आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

अग्रलेखांच्या बादशाहा,ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर कालवश
अग्रलेखांच्या बादशाहा,ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर कालवश

मराठी पत्रकारितेत 'अग्रलेखांचे बादशहा' म्हणून ओळखले जाणारे लेखक नीलकंठ ....

Read more