By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 06:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सांगली
सांगली : तक्रार निवारण दिवशीच १ फेब्रुवारीला व्हिडीओ कॉन्फरन्स ही कार्यप्रणाली सांगलीत स्थापन करण्यात आली. राज्याच्या सांगली जिल्ह्यामधील पोलीस दलात ई-सवांद म्हणजेच (व्हिडीओ कॉन्फरन्स) कार्यप्रणाली सुरू करण्यात आली. तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये ही कार्यप्रणाली सुरू झाली असून गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदार घटनास्थळावरुनच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पोलीस अधिकार्यांच्या सामोरा-समोर आपली तक्रार स्पष्ट करू शकतो.
तक्रार दाखल करून सुद्धा कारवाई होत नसेल किवा करवाईला वेळ लागत असेल तर एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराला पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या फेर्या माराव्या लागतात. म्हणूनच तक्रारदाराला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही अशी दखल सांगली पोलिसांनी घेतली आहे. दरम्यान, पोलीस दलातील ई-सवांद कार्यप्रणालीचे सुरू केल्या बद्दल जिल्ह्यातील नागरिकांनी सांगली पोलीस दलाचे कौतुक केले आहे.
बॅंक घोटाळ्यांच्या बातम्या आल्यानंतर बँकांवर आरबीआय निर्बंध लादते. त्याम....
अधिक वाचा