ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चाललेल्या नवी मुंबईतही लॉकडाऊन जाहीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 01, 2020 10:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चाललेल्या नवी मुंबईतही लॉकडाऊन जाहीर

शहर : navi Mumbai

ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर नंतर आता नवी मुंबईमध्ये देखील लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. ३ जुलैपासून १३ जुलैपर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या बाबतचे आदेश जारी केले असून एपीएमसी आणि औद्योगिक क्षेत्राला मात्र यामधून वगळले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना चिंतेचं वातावरण आहे. नवी मुंबईला लागून असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल मध्ये देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढू लागली आहे.

                

नवी मुंबईत आज कोरोनाचे २१८ रुग्ण वाढले असून एकूण कोरोना संकमितांची संख्या ६८२३ वर पोहोचला आहे. आज ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या २१७ वर पोहोचली आहे.

आज बेलापूरमध्ये ३०, नेरुळ २७, वाशी १८, तुर्भे २४, कोपरखैरणे २७, घणसोली ३३, ऐरोली ४९, दिघा १० रुग्ण आढळले आहेत. तर आज ८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३८३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

मागे

मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश; कलम १४४ लागू
मुंबईत पुन्हा जमावबंदीचे आदेश; कलम १४४ लागू

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या पाह....

अधिक वाचा

पुढे  

सर्व राज्यांमध्ये दारुविक्री बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका
सर्व राज्यांमध्ये दारुविक्री बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

सुप्रीम कोर्टात सगळ्या राज्यांमध्ये दारुविक्री थांबवावी म्हणून एक याचिका....

Read more