ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं; नेमकं काय घडलं…?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 09, 2021 10:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं; नेमकं काय घडलं…?

शहर : अमरावती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचं पाहायला मिळालं. निधीच्या मागणीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाच्या बैठकीदरम्यान हा प्रकार घडला. (Conflict Between DCM Ajit Pawar And State Minister Bacchu Kadu)

अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक सोमवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी अकोला जिल्ह्याला दिलेल्या निधीवर बच्चू कडू समाधानी नव्हते. परिणामी बच्चू कडू यांनी आक्रमक होत नाराजी व्यक्त केली.

नियोजन भवनात पार पडलेल्या बैठकीत विविध लोकप्रतिनिधींच्या मागण्या लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली. तसंच यवतमाळ 325 कोटी, बुलडाणा 295 कोटी, वाशिम 185 तर अकोला जिल्ह्यासाठी 185 कोटींचा निधी देण्यात आला.

अजित पवार यांच्या निधी वाटपावर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे. आपण अधिक निधीची मागणी करुनही कमी निधी मिळाल्याची भावना कडू यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे विभागातील पाचही जिल्ह्यांना तरतुदीपेक्षा वाढीव निधी दिल्याचं अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

मी सरकारमध्ये असल्याने बोलू शकत नाही. मात्र विदर्भाचा अनुशेष भरुन काढला जावा, यासाठी आपण अधिक निधीची मागणी केली होती, मात्र निधी वाढून देण्यात आला नाही. परंतु निधी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असं बच्चू कडू म्हणाले.

 

मागे

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच, 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा नाहीच, 100 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार

कोरोनाकाळात अभ्यासक्रम पूर्ण न शिकवता आल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांची मान....

अधिक वाचा

पुढे  

नरेंद्र मोदी राज्यसभेत का भावूक झाले? मोदींना प्रणव मुखर्जींची आठवण का झाली?
नरेंद्र मोदी राज्यसभेत का भावूक झाले? मोदींना प्रणव मुखर्जींची आठवण का झाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राज्यसभेत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Muk....

Read more