By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 21, 2020 08:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठा समाजातील बड्या नेत्यांनाच आरक्षण नकोय असा दावा करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थेट आव्हान दिलं आहे. मराठा आरक्षण कुणाला नकोय? चंद्रकांतदादा ‘त्या’ नेत्यांची नावं जाहीर करा, असं आव्हानच अशोक चव्हाण यांनी पाटील यांना दिलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.मराठा आरक्षण कुणला नकोय? त्यांची नावं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली पाहिजे. रोज मतमतांतरे होण्यापेक्षा सकल मराठा समाजाचा एकच आवाज आला पाहिजे. रोज वेगवेगळी विधाने करून गोंधळ निर्माण केला जात आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
बडे मराठा नेतेच आरक्षण विरोधी आहेत, हे मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आलो आहे, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. गेली १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची क्लिअरकट सत्ता होती. मग मराठा समाजाला का नाही आरक्षण दिलं?, असा सवाल करतानाच मराठा समाजाला आरक्षण दिल्याने त्यांच्या पुढे बॅकवर्ड हा शब्द लागेल. तेच मराठा नेत्यांना नको आहे. त्यांच्या मनात आपण फॉरवर्ड असल्याची भावना असून या भावनेला धक्का बसू नये असं त्यांना वाटतं. पण आता मराठा समाजाच्या प्रगतीसाठी या नेत्यांनी फॉरवर्ड आणि बॅकवर्ड कपाटात ठेवावं, असा टोलाही त्यांनी लगावला होता. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी पाटील यांना हे आव्हान दिलं आहे.
दरम्यान, चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थितीत होते. “मराठा आरक्षणाबाबत काही कायदेशीर मुद्दे आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाली होती. त्याची माहिती शरद पवारांना दिली,” अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी या बैठकीनंतर दिली. यावेळी त्यांनी कृषीविधेयकावरही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांची गळचेपी होतं आहे. मध्यस्थांचा फायदा होतो आहे. याला काँग्रेसचा विरोधचं आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने सभात्याग का केला ते त्यांनाच विचारा. राज्यात आम्ही एकत्र आहोत, केंद्रांतही एकत्र असायला हवं होतं. शेतकरी हितासाठी काँग्रेस लढत आहे, तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकर्यांचे हात मजबूत केले पाहिजेत,” असं त्यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न....
अधिक वाचा