By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 22, 2019 11:14 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नागरिकत्व कायद्याला देशभरात विरोध होत असताना, दिल्लीतल्या राजघाट इथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी धरणं आंदोलन करणार आहेत. उद्या दुपारी ते राजघाट इथे महात्मा गांधीच्या समाधीस्थळी आंदोलन करणार आहेत. दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत हे आंदोलन केलं जाणार आहे. नागरिकत्व कायद्याबाबत राजघाटवर जाऊन निषेध व्यक्त करणार असून, हिंसेचं उत्तर अहिंसेच्या माध्यमातून देण्यासाठी राजघाटवर जाणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले आहे. या आंदोलनाद्वारे राहुल गांधी प्रथमच नागरिकत्व कायद्यावर मैदानात उतरणार आहेत.
सातारा - हिंदू धर्मामध्ये पिंडाला कावळा शिवल्या शिवाय त्या मृ....
अधिक वाचा