ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

" कवितेच्या विषयानुसार आशयही सघन असावा - डाॅ लक्ष्मण शिवणेकर "

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 04:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : मुंबई

प्रतींनिधी- अनुज केसरकर-:विकास संशोधन प्रतिष्ठान  (DRF)  आयोजित 'कवितांजली' चे १९ वे खुले कविसंमेलन स्पर्धाएस एम पब्लिक हायस्कूल, भाईंदर (पू) येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाले. सरस्वती पूजनाने संमेलनाची सुरुवात झाली. व्यासपीठावर प्रमुख अतिथी श्रीपत मोरे , शंकर जंगम साहित्यसंध्या समूहाचे कार्यवाह कवी सुरेश कुलकर्णी उपस्थित होते. जेसलपार्क जेष्ठ नागरिक सेवासंघाचे उपाध्यक्ष श्रीपत मोरे, सचिव शंकर जंगम, सहसचिव भाटिया महिला विभागाच्या अध्यक्षा शालिनी राऊत यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून सन्मानित करण्यात आले. उपस्थित कवींनी विविध विषयांवर स्वरचित कविता,गझल रचना,पोवाडा प्रभावीपणे सादर करून स्पर्धा कविसंमेलन बहारदार केले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण शिवणेकर होते.कवींनी निवडलेल्या विषयानुसार कवितेचा आशयही सघन करावा असे अध्यक्षीय मनोगतात सांगितले .

याप्रसंगी १७ नोव्हेंबर ,२०१९ रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील पुढील यशवंत कवींना रजनी निकाळजे   (प्रथम ), निलेश हेंबाडे(द्वितीय ), हरिश्चंद्र मिठबावकर(तृतीय) मान्यवरांच्या हस्ते गुणवत्ता सन्मानपत्र तसेच सर्व स्पर्धक कवींना सहभागाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.सर्वांना आगामी नूतन वर्षाच्या   शुभेच्छा देऊन, राष्ट्रगीताने कविसंमेलनाची सांगता झाली.सूत्रसंचालन विजय म्हामुणकर यांनी केले.

 

 

मागे

पालिका नव्याने बांधणार ११ धोकादायक पूल
पालिका नव्याने बांधणार ११ धोकादायक पूल

           मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीसाठी ‘हद्दीत वा....

अधिक वाचा

पुढे  

थंडीपासून बचावण्यासाठी बकऱ्यांनाही शर्ट
थंडीपासून बचावण्यासाठी बकऱ्यांनाही शर्ट

        जालना - देशात अनेक ठिकाणी थंडीची लाट असतानाच आता राज्यातही बऱ्या....

Read more