ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यात कोरोनाचा तिसरा बळी, 60 वर्षीय महिलेचा मृत्यू; राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 638 वर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 05, 2020 12:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात कोरोनाचा तिसरा बळी, 60 वर्षीय महिलेचा मृत्यू; राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 638 वर

शहर : पुणे

राज्यात शनिवारी २४ तासांत एकूण १४५ नव्या रुग्णांची नोंद असून आज सकाळी बुलडाण्यात आणखी 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या ६३८ वर पोहोचली आहे. यापैकी ९९ रुग्णांची नोंद ही मुंबईत झाली आहे. पुण्यात १२, ठाणे जिल्हा व अन्य मनपामध्ये २२, नागपूर, अहमदनगर, हिंगोली, अमरावती प्रत्येकी १, लातूर ८, उस्मानाबादेत २ रुग्णांची नोंद झाली. शनिवारी ६ जणांचा मृत्यू नाेंद झाला. यापैकी ४ जण मुंबईतील, १ मुंब्रा ठाणे व १ अमरावतीचा आहे. मृत्यूंचा आकडा आता ३२ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात ४२ हजार ७१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २९१३ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. मरकजमधील रुग्णांचा आकडा ७ वर स्थिर आहे. यात निलंग्यातील रुग्णांचा समावेश नाही.

पुण्यात आणखी दोन मृत्यू

पुणे शहराच्या करोनाची बाधा झालेल्या दोन रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. यामध्ये एका ६० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा तर ४८ वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. पुरुषाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यांना करोनाची बाधा झाल्याचे अहवाल रात्री उशिरा आले होते. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

तसेच, ६० वर्षांची महिला काही दिवसांपूर्वी डाॅ.नायडू रुग्णालयात उपचारांसाठी आली होती. तिची चाचणी घेतली असता तो अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला नायडू रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आले होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने तिला काल ससूनला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ती मयत झाली. दरम्यान, तिचा स्वब चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल प्राप्त झाला असून तिला करोनाची लागण झाल्याचे या अहवालात निष्पन्न झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात आणखी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह, आता एकूण संख्या आठ

आज सकाळी प्रतिक्षेत असलेल्या रिपोर्ट प्राप्त झाले असून तिघांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती जिल्ह्या शल्य चिकित्सक यांनी दिली. हे तिघेही मरकज येथे गेले होते. देऊळगाव राजा, खामगाव व चिखली येथील रहिवासी आहेत. जिल्ह्यातील एकूण 17 व्यक्ती मरकजला गेले होते.

राज्यातील रुग्णांचा तपशील : मुंबई ३७७, ठाणे मनपा ७७, पुणे व ग्रामीण ८२, सांगली २५, नागपूर-अहमदनगर प्रत्येकी १७, लातूर ८, बुलडाणा 8, यवतमाळ ४, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद प्रत्येकी ३, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव प्रत्येकी २, सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, अमरावती, हिंगोली प्रत्येकी १ आणि गुजरातेत १.

७०८ जण भरती : राज्यात शनिवारी ७०८ जण भरती झाले. आजवरच्या १४,५०३ नमुन्यांपैकी १३, ७१७ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. ६३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५२ करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

मागे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष....

अधिक वाचा

पुढे  

काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान
काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीर एकिकडे कोरोनाचा सामना करत आहे, तर दुसरीकडे दहशतवाद्यांना देखील चां....

Read more