ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशात झपाट्याने होतोय कोरोनाचा संसर्ग, रुग्णांची संख्या 20 लाखांवर

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2020 10:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

देशात झपाट्याने होतोय कोरोनाचा संसर्ग, रुग्णांची संख्या 20 लाखांवर

शहर : देश

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे. दररोज 50 हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीनुसार आता देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट 67.62 टक्के आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात 20,27,075 कोरोना रुग्णांची पुष्टी केली आहे. या व्यतिरिक्त देशात कोरोनामुळे 41,585 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 13,78,106 रुग्णांनी कोरोना मात केली आहे. अजूनही  6,07,384 कोरोना  रुग्ण उपचार घेत आहेत.

सर्वाधिक प्रभावित राज्य

देशात अशी 6 राज्ये आहेत जिथे कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या एक लाखाहून अधिक झाली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर गेली आहे.

कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत कोरोनाचे 4.79 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. तामिळनाडूमध्ये 2.79 लाख, आंध्र प्रदेशात 1.96 लाख, कर्नाटकात 1.88 लाख, दिल्लीत 1.41 लाख आणि उत्तर प्रदेशातील 1.08 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

मागे

आजपासून धावणार देशातली पहिली किसान रेल्वे, महाराष्ट्रातून मिळणार हिरवा कंदील
आजपासून धावणार देशातली पहिली किसान रेल्वे, महाराष्ट्रातून मिळणार हिरवा कंदील

देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने या....

अधिक वाचा

पुढे  

नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाचा विळखा, चार आमदारांनंतर आता खासदारालाही लागण
नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाचा विळखा, चार आमदारांनंतर आता खासदारालाही लागण

नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मु....

Read more