ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सिंगापूरमध्ये अडकलेले 50 भारतीय विद्यार्थी अखेर मायदेशी परतले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 10:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सिंगापूरमध्ये अडकलेले 50 भारतीय विद्यार्थी अखेर मायदेशी परतले

शहर : मुंबई

कोरोनाचा भारतात वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारने परदेशातील प्रवाशांवरही निर्बंध घातले आहेत. त्याचा फटका फिलिपीन्समध्ये शिकणाऱ्या 50 भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. भारतात येण्यासाठी निघालेल्या या विद्यार्थ्यांना सिंगापूर विमानतळावर रोखण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर ते 50 विद्यार्थी भारतात परतले आहेत.

सध्या त्यापैकी मुंबईच्या बाहेरील विद्यार्थ्यांना सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर मुंबईतील विद्यार्थ्यांना पुढील 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

या विद्यार्थ्यांनी फिलिपीन्सवरुन भारताच्या दिशेने प्रवास सुरु केला. मात्र, सिंगापूर विमानतळावर आल्यावर त्यांना भारताच्या दिशेने जाणाऱ्या विमानात प्रवेश बंदी करण्यात आली. त्यामुळे हे विद्यार्थी सिंगापूर विमानतळावर अडकले होते. सिंगापूरहून एअर इंडियाच्या विमानाने ते भारतात दाखल होणार होते. मात्र, सिंगापूर सरकारच्या आदेशानुसार, या विद्यार्थ्यांना सिंगापूरहून भारतात पाठविता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलं.सिंगापूरमध्ये अडकलेल्या 50 विद्यार्थ्यांना मुंबईत सुखरुप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूर मधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात होते. हे 50 विध्यार्थी मायदेशी परतले.

या 50 विद्यार्थ्यांपैकी जे मुंबईत राहातात, त्यांना त्यांच्या घरी क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पुढील 14 दिवसांसाठी या विद्यार्थ्यांनी कुणाच्या संपर्कात येऊ नये असे सांगण्यात आलं आहे. तर इतर विद्यार्थी जे सुरत, कोल्हापूर आणि मुंबईच्या बाहेर राहाणारे आहेत, त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांना एका दिवसासाठी क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांचा आरोग्य अहवाल येईपर्यंत त्यांना इथेच ठेवलं जाईल.

 

मागे

२२ मार्चला देशभरात 'जनता कर्फ्यु' पाळा; मोदींचे नागरिकांना आवाहन
२२ मार्चला देशभरात 'जनता कर्फ्यु' पाळा; मोदींचे नागरिकांना आवाहन

कोरोना व्हायरसचा (COVID 19) सामना करण्यासाठी येत्या २२ मार्चला देशातील नागरिकां....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाचा फैलाव : संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवर असे ठेवणार लक्ष
कोरोनाचा फैलाव : संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवर असे ठेवणार लक्ष

मंत्रालयात राज्यस्तरीय कोरोना नियंत्रण कक्ष तयार केला जाणार आहे. आपत्काली....

Read more