ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अनलॉकनंतर नवी मुंबईतील 146 पोलिसांना कोरोना, कुटुंबीयही विळख्यात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 27, 2020 12:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अनलॉकनंतर नवी मुंबईतील 146 पोलिसांना कोरोना, कुटुंबीयही विळख्यात

शहर : मुंबई

अनलॉकनंतर पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या वाहनांवरील कारवाईदरम्यान नवी मुंबई पोलीस दलातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. नवी मुंबईत काल (26 जुलै) 24 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये कामोठे पोलीस ठाण्यातील 8 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

नवी मुंबईत पोलीस कर्मचारी 24 तासांपैकी 14 तास रत्यावर उभे राहून कर्तव्य पार पाडत आहेत. हे कर्तव्य पार पाडत असताना नवी मुबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या माथी आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार चौकाचौकात उभं राहून हे कर्मचारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करताना दिसून येत आहे. या कारवाईदरम्यान पोलीस कर्मचारी अनेकांच्या संपर्कात येत असून त्यांनादेखील कोरोनाची लागण होऊ लागली आहे.

वाहनाची कागदपत्रे तपासणे, चौकशी करणे, वाहनं जप्त करणे, त्यांना कोर्टात हजर करणे यांसारख्या जबाबदारीच्या कामांमुळे आता पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. नवी मुबई पोलीस दलात काम करणाऱ्या 146 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. यापैकी काही पोलिसांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 50 टक्के पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर, कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा पोलीस कर्मचाऱ्यांना बसला आहे. राज्यात जवळपास 4 हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी मुंबई पोलीस दलातील सर्वाधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ आता नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे.

देशात तीन महिने कडकडीत लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रीया सुरु करण्यात आली. या अनलॉकनंतर लोक घराबाहेर पडू लागल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यातूनच पोलिसांनाही कोरोनाची लागण होऊ लागली. राज्यात आतापर्यंत 4 हजारापेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ आता नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकू लागले आहेत.

अनलॉकच्या घोषणेनंतर नवी मुबई आणि पनवेल परिसरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. नवी मुबई परिसरातील कोरोनाबधितांचा आकडा हा 14 हजाराच्या घरात पोहोचला आहे. त्यासोबत पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबधितांची संख्या 5 हजाराच्या जवळपास गेली आहे. अशा परस्थितीतही नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत.

मागे

मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली, 1 सप्टेंबरला प्रत्यक्ष सुनावणी
मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली, 1 सप्टेंबरला प्रत्यक्ष सुनावणी

मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणी दरम्यान आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झा....

अधिक वाचा

पुढे  

पुणे जिल्ह्यात 500 खाजगी रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आरटीओकडे प्रस्ताव
पुणे जिल्ह्यात 500 खाजगी रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आरटीओकडे प्रस्ताव

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्....

Read more