By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2020 07:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे महापालिकेत आतापर्यंत 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये एकूण 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तसेच यामध्ये 298 जण कायमस्वरूपी तर 76 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पालिकेतील 374 कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
पालिकेच्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी विमा कंपन्यांची चालढकल सुरु आहे. मात्र मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि पालिकेत नोकरीचं आश्वासन पाळलं जाईल, अशी माहिती महापौरांनी दिली आहे.
पुण्यातीतल 11 पोलिसांवर निलंबनाची कारवाई
कामात हलगर्जीपणा केल्यामुळे पुणे पोलीसातील 11 जणांवर पोलीस आयुक्तांनी कडक कारवाई केली आहे. ज्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते कॉन्स्टेबल अशा 11 जणांचा समावेश आहे. या सर्वांवर वेतनवाढ रोखणे ते निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.गुन्हा दाखल करण्यास विलंब, अनावश्यक गुन्हे दाखल करणे अशा वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.दरम्यान, पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर आळा बसवण्यासाठी पालिकेसह स्थानिक प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. नुकतेच पुण्यात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जंबो रुग्णालय येत्या काही दिवसांत बांधले जाणार आहे.
भारतीय आंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) मिशन चंद्रयान-2 मधील रोव्हर आत्ताही चंद....
अधिक वाचा