ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत झोपडपट्ट्या-चाळींपेक्षा कोरोनाचा बिल्डिंगमध्येच जास्त फैलाव, बीएमसीसमोर मोठं आव्हान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 15, 2020 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत झोपडपट्ट्या-चाळींपेक्षा कोरोनाचा बिल्डिंगमध्येच जास्त फैलाव, बीएमसीसमोर मोठं आव्हान

शहर : मुंबई

राज्याची राजधानी मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींपेक्षा बिल्डिंगमध्येच कोरोनाचा जास्त फैलाव होत असल्याचं समोर आलं आहे. मागील 12 दिवसांमध्ये मुंबईतील इमारतींमध्ये वेगानेप्रतिबंधवाढले आहेत. त्यामुळे पालिकेसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. मुंबईतील सीलबंद इमारतींची संख्या सध्या 8 हजार 637 वर पोहचली आहे. तर सीलबंद चाळी-झोपडपट्ट्यांची संख्या 557 इतकी आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना झोपडपट्ट्या-चाळींपेक्षा इमारतींमध्येच कोरोनाचा फैलाव सर्वाधिक असल्याचे समोर आलं आहे. 1 सप्टेंबरपासून 12 सप्टेंबरपर्यंत फक्त 12 दिवसांमध्ये इमारतीमधील कंटेनमेंट झोनची संख्या तब्बल 2334 इतकी वाढून 8637 वर पोहोचली आहे. झोपडपट्ट्या-चाळींमध्ये मात्र प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 20 ने कमी होऊन 557 झाली आहे. त्यामुळे बड्या सोसायट्या आणि इमारतींमध्ये कोरोना रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर निर्माण झाले आहे.

 विना मास्क फिरणारे नागरिक आणि मंडईतील भाजीविक्रेत्यांमुळे मुंबईत कोरोना संसर्ग वाढण्यात भर पडत असल्याचाही आरोप होत आहे. पालिका वारंवार मास्क घाला, अशी विनंती करुनही नागरिक याला गांभीर्याने घेताना दिसत नाही. मास्कसाठी मुंबईकरांना दंड सुद्धा आकारला जातो, पण भाजी मंडईत विक्रते मास्क घालताना दिसत नाहीत. भाजी विक्रत्यांचा नागरिकासोबत थेट संपर्क येत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोरोनाचं भान येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पुन्हा घसरु लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या दहा दिवसात डबलिंग रेट 84 वरुन 58 दिवसांवर आला आहे. एकीकडे मुंबईत दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत आहे, तर डबलिंग रेट किंवा रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही घसरु लागला आहे. म्हणजेच कोरोनाचे रुग्ण वेगाने दुप्पट होऊ लागले आहेत. तर रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे.गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी हळूहळू वाढू लागला होता. एक सप्टेंबरपर्यंत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 80 ते 100 दिवसांवर स्थिरावला होता. 31 ऑगस्टला तो 84 दिवस इतका होता. मात्र अवघ्या दहा दिवसात तो घसरुन तब्बल 58 दिवसांवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी 67 दिवस होता.गेल्या महिन्याभरात मुंबईत रोज 1000 ते 1200 या दरम्यान नवे रुग्ण सापडत होते. मात्र आता 2000 हून अधिक नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. वाढती कोरोना रुग्णसंख्या मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. यामुळे मुंबई महापालिकेपुढे आव्हान उभे राहिले आहे.

मुंबईतील कोरोना वाढती रुग्ण संख्या

तारीखरुग्ण संख्यामृत्यू

13 सप्टेंबर – 2081 – 41

12 सप्टेंबर – 2321 – 42

11 सप्टेंबर – 2172 – 44

10 सप्टेंबर – 2371 – 38

9 सप्टेंबर – 2227 – 43

तर दुसरीकडे मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. तसेच मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.20 टक्के झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. तर दुसरीकडे मुंबईत बेडची संख्या ही कमी होत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे ही लक्ष द्यावं, असं मत विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केलं आहे.

मागे

मुघल संग्रहालयाला योगी सरकारने दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव
मुघल संग्रहालयाला योगी सरकारने दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्यात आलं आहे. मोघल ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा वाढतोय, रुग्णवाढीची कारणं काय?
मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा वाढतोय, रुग्णवाढीची कारणं काय?

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा डोकं वर ....

Read more