ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अखेर कोरोनाचा शिरकाव,‘या’ शहरात कोरोना रुग्णाचा मृत्यू;तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती काय?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 03, 2024 07:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अखेर कोरोनाचा शिरकाव,‘या’ शहरात कोरोना रुग्णाचा मृत्यू;तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती काय?

शहर : सोलापूर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून देशात नोंदवलेल्या संसर्गामध्ये घट होत आहे, मंगळवारी 572 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. ताज्या प्रकरणांमुळे देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 4,565 झाली आहे.

देशासह राज्यात कोरोनाची (Corona JN 1 Update) आकडेवारी वाढत चाललेली आहे. जवळपास दिड वर्षानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे. सोलापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरात कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. 31 डिसेंबर रोजी 72 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मुत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार  रुग्णाला कोरोनासह रक्तदाब, मधुमेहचा देखील होता त्रास तसेच बायपास सर्जरी देखील झालेली होती.

खोकला आणि ताप असल्याने केली होती चाचणी

काही दिवसापूर्वी ताप आणि खोकला असल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णाची कोविड चाचणी पॉसिटीव्ह आली होती. दरम्यान जे. एन. 1 व्हेरियंटचा हा रुग्ण होता की नाही यासंदर्भात अद्याप अहवाल आलेला नसल्याची प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांची माहिती. दिलासादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या रुग्णच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, तसेच लोकांनी घाबरून जाता काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहनकोरोनाचे ज्यांना लक्षण आहेत अशा रुग्णांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. राज्यात काल मंगळवारी 105 कोरोना बाधीतांची नोंद झाली. यापैकी 16 प्रकरणं कोरोनाचा उप प्रकार JN.1 संबंधीत होते.

नवीन कोरोना बाधीतांची संख्या दिवसंदिवस वाढत चालली असल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे या व्हेरीयंटचा धोका हा या आधी आलेल्या कोरोना इतका धोकादायक नसल्याचेही काही आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र नागरिकांनी मास्क वापणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

लोकांमध्ये चिंतेचे वातावरण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून देशात नोंदवलेल्या संसर्गामध्ये घट होत आहे, मंगळवारी 572 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. ताज्या प्रकरणांमुळे देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 4,565 झाली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 24 तासांच्या कालावधीत, कर्नाटक आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एक, दोन लोकांचा संसर्ग झाला. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4.4 कोटींहून अधिक आहे आणि राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्के आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने नवीन प्रकार, JN.1 ला त्याचा वेगाने वाढणारा प्रसार पाहता एक वेगळा उप प्रकार म्हणून वर्गीकृत केले, तसेच ते जागतिक सार्वजनिक आरोग्य धोक्यात असल्याचे सांगितले. मंगळवारी, भारतात JN.1 प्रकारासह कोविड-19 चे एकूण 312 प्रकरणे नोंदवली, त्यापैकी सुमारे 47 टक्के प्रकरणे केरळमध्ये नोंदली गेलीकेरळ (147), गोवा (51), गुजरात (34), महाराष्ट्र (26), तामिळनाडू (22), दिल्ली (16), कर्नाटक (8), राजस्थान (5), तेलंगणा (2) आणि ओडिशा यांचा समावेश आहेडिसेंबरमध्ये, JN.1 ची उपस्थिती असलेली 279 कोविड प्रकरणे होती.

मागे

धारावी पुनर्विकास प्रकल्पात जगप्रसिद्ध आरेखक आणि नियोजकांचा सहभाग, मास्टर प्लॅन सादर करणार!
धारावी पुनर्विकास प्रकल्पात जगप्रसिद्ध आरेखक आणि नियोजकांचा सहभाग, मास्टर प्लॅन सादर करणार!

धारावी पुनर्विकास प्रकल्पात जगप्रसिद्ध आरेखक आणि नियोजकांचा सहभाग आहे. धा....

अधिक वाचा

पुढे  

महानंद प्रकल्प गुजरातला जाणार? महानंदच्या दूधावरून राजकारण तापलं; दावे प्रतिदावे काय?
महानंद प्रकल्प गुजरातला जाणार? महानंदच्या दूधावरून राजकारण तापलं; दावे प्रतिदावे काय?

महानंदा दूध प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. ठाकरे गट....

Read more