ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, राज्यात 63 तर देशात 285 रुग्ण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 03:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली, राज्यात 63 तर देशात 285 रुग्ण

शहर : मुंबई

कोरोना व्हायरस जगात चिंतेचा विषय ठरत असताना आता भारतात ही कोरोनाचा धोका वाढला आहे. आज महाराष्ट्रात कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळून आले असून देशात ही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. देशातील अनेक शहरं बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे व्यवहार ठप्प आहेत. किराणा दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि मेडिकल सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतात कोरोेनाचा संसर्ग हा दुसऱ्या टप्प्यात आहे. कोरोनाचा संसर्ग तिसऱ्या टप्प्यात जावू नये म्हणून सरकारचा प्रयत्न आहे. पण देशातून आणि राज्यातून कोरोनाचे वेगवेगळे प्रकरण समोर येत आहेत.

-अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 ते 24 मार्च दरम्यान जिल्ह्यात लॉक डाउन. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

-अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ओळखपत्र पाहून त्यांनाच केवळ लोकल, बसमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात विचार सुरू - आरोग्यमंत्री

-परिस्थितीची गैरफायदा कुणीही घेवू नये, राष्ट्रीय भावना महत्वाची - आरोग्यमंत्री 

-फेज- साठी सरकारी, खाजगी, वैद्यकीय कॉलेजमधील बेड, व्हेंटीलेटर तयार, मृत्यूदर कमी, बरे होण्याचे प्रमाण जास्त, त्यामुळं घाबरण्याचे कारण नाही - आरोग्यमंत्री

-६३ पैकी १४ लोकांना संसर्ग, तर इतर लोकं बाहेरून आलेले आहेत- आरोग्यमंत्री राजेश टोपे

-केंद्रीय आरोग्यमंत्र्याचे मत आहे की, लोकल बंद करायला हव्यात. गर्दी कमी होत नसेल तर लोकल बंद कराव्या लागतील. - राजेश टोपे

-गावी जाण्यासाठी लोकं रेल्वे स्टेशनवर गर्दी करतायंत, त्यामुळे ज्यादा रेल्वे सोडण्याची गरज - आरोग्यमंत्री

राज्यात आज कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 63 वरमुंबईत 10 तर पुण्यात 1 रुग्ण आढळला. - आरोग्यमंत्री राजेश टोपे

                                            

मागे

कोरोनाचा फैलाव : सोशल मीडियावरुन अफवा पसरवाल तर खबरदार, महाराष्ट्र सायबरचा इशारा
कोरोनाचा फैलाव : सोशल मीडियावरुन अफवा पसरवाल तर खबरदार, महाराष्ट्र सायबरचा इशारा

राज्यात दिवसागणिक कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोन....

अधिक वाचा

पुढे  

जनता कर्फ्यूमुळे कोकण रेल्वे मार्गावरील या गाड्या रद्द
जनता कर्फ्यूमुळे कोकण रेल्वे मार्गावरील या गाड्या रद्द

राज्यात कोरोना व्हायरसचे संकट वाढत आहे. त्यामुळे उद्या रविवारी जनता कर्फ्य....

Read more