ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कंन्टेनमेंट झोनमध्ये सण साजरे होणार नाहीत, आरोग्य मंत्रालयाचा आदेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2020 01:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कंन्टेनमेंट झोनमध्ये सण साजरे होणार नाहीत, आरोग्य मंत्रालयाचा आदेश

शहर : देश

देशात कोरोनाचा (corona pandamic) धोका दिवसेंदिवस वाढ असल्यामुळे अनेक सण (festive season) सध्या पद्धतीने साजरे करावे लागले. पण आता दिवाळी (Diwali) हा सगळ्या मोठा आणि महत्त्वाचा सण तोंडावर आला आहे. या सणावरदेखील कोरोनाचं सावट असणार आहे. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरू झाली. पण असं असलं तरी सणांच्या काळात लॉकडाऊनचे (Lockdown) नियम पाळावे लागणार आहेत. कारण या सणांदरम्यान, कोरोनाचा धोका आणखी वाढणार असल्याची चिंता आरोग्य मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे. (corona news no festivities in containment zones said by health ministry)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मानक संचालन प्रक्रिया (SOPs) जारी करत कंन्टेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्यांनी घरात सण साजरे करावे अशी विनंती केली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाच्या संक्रमणाचा धोका जास्त आहे अशा ठिकाणी सण साजरे करता येणार नाहीत. इतकंच नाही तर कार्यक्रमाच्या आयोजनावरदेखील बंदी असणार आहे.

कंन्टेनमेंट झोनच्या बाहेर सण साजरे करण्यावर आणि कार्यक्रमांच्या आयोजनावर परवानगी देण्यात येईल. पण कंन्टेनमेंट झोनमधील आयोजकांना, कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना यामध्ये सहभागी होण्याची सहमती नसणार आहे. त्यामुळे कंन्टेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरातच सण साजरे करावे लागणार आहेत.

दरम्यान, ज्या ठिकाणी सण साजरे करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे तिथे कोरोनाचा धोका रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सर्व नियमांचं पालन होणं महत्त्वाचं आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्क वापरणं, थर्मल स्क्रिनिंग, सोशल डिस्टंसिंग आणि सॅनिटायझरचा वापर करणं अनिवार्य आहे. (corona news no festivities in containment zones said by health ministry)

दरम्यान, 1 ऑक्टोबरपासून अनेक सण-उत्सवांना सुरुवात होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालय काही निर्बंध शिथील करु शकतं, असं बोललं जात आहे. तसेच आगामी बिहार निवडणुका पाहता केंद्राकडून येत्या काही दिवसात अनलॉक – 5 च्या गाईडलाईन्स जारी केल्या जाऊ शकतात.

विशेष म्हणजे सणांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवर निर्बंध शिथील केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग, मास्क, गर्दी टाळणे अशा काही अटी-शर्तीद्वारे ही सूट दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे अनेक शॉपिंग मॉल्सलाही या गाईडलाईन्स दरम्यान सूट दिली जाऊ शकते.

मागे

WHOची मोठी माहिती : केव्हापर्यंत येणार कोरोनाचं 'कारगर व्हॅक्सीन'
WHOची मोठी माहिती : केव्हापर्यंत येणार कोरोनाचं 'कारगर व्हॅक्सीन'

जगभरात कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीनची ट्रायल सुरू आहे. या दरम्यान व्हॅक्स....

अधिक वाचा

पुढे  

...तर तुम्ही काहीही करू शकणार नाही; राज ठाकरेंची मूर्तीकारांना धोक्याची सूचना
...तर तुम्ही काहीही करू शकणार नाही; राज ठाकरेंची मूर्तीकारांना धोक्याची सूचना

“प्लॅस्टर ऑफ परिसच्या मूर्त्या विसर्जनानंतर पुन्हा किनाऱ्यावर येतात. ते ....

Read more