ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यात कोरोना बळींची संख्या वाढतीच, एकाच दिवसात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 05, 2020 11:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात कोरोना बळींची संख्या वाढतीच, एकाच दिवसात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू

शहर : पुणे

पुणे जिल्ह्यात काल (4 जुलै) रेकॉर्ड ब्रेक 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1168 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 27 हजार 311 बाधित रुग्ण आढळले आहेत.

पुणे पालिका हद्दीत दिवसभरात 819 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात आतापर्यंत 20, 668 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यासोबत काल दिवसभरात 18 बाधित रुग्णांचा मृत्यू तर आतापर्यंत 703 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात दिवसभरात 399 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात 12689 रुग्ण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टिव रुग्ण 7276 असून क्रिटिकल 385 आणि 56 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

      

दरम्यान, राज्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 64 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत एकूण 1 लाख 08 हजार 082 रुग्ण बरे झाले आहेत.

मागे

धोका वाढला; भारतात एका दिवसात २४८५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद
धोका वाढला; भारतात एका दिवसात २४८५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद

जुलै महिन्यात भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचेल, ही तज्ज्ञांनी व....

अधिक वाचा

पुढे  

पुणेकरांकडून नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून एका दिवसात 1 हजार 16 कारवाया
पुणेकरांकडून नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून एका दिवसात 1 हजार 16 कारवाया

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथी....

Read more