By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 31, 2020 01:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बीड
कोरोना कक्षात अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे रुग्णांची मोठी तारांबळ उडाली. व्हेंटिलेटर बंद पडल्याने बीडमधील रुग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
व्हेंटिलेटर बंद पडल्यावर रुग्ण अक्षरशः तडफडत असतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बीडच्या शासकीय कोरोना कक्षातील ही विचलित करणारी दृश्य आहेत.
रुग्ण तडफडत असताना काय करावं हे डॉक्टरांनाही समजत नव्हतं. रुग्णाच्या नातेवाईकांनीच धावपळ करत कक्षातीलच ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती आहे.
संबंधित रुग्ण गेवराई तालुक्यातील असून त्या रुग्णाचा अखेर काल रात्री मृत्यू झाला. रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना विजेची अद्यावत सोय करुन ठेवणं गरजेचं होतं. परंतु असं न झाल्यामुळे शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
दरम्यान, केवळ काही सेकंद व्हेंटिलेटर बंद पडले होते. मात्र रुग्णाला कसलाच त्रास होऊ दिला नाही. दोन दिवसांपूर्वी सदर रुग्ण निगेटीव्ह आला होता, मात्र काल तो अत्यवस्थ झाल्यानंतर त्याची चाचणी केली गेली तेव्हा तो रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. काल रात्री त्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 738 वर पोहचला आहे तर आतापर्यंत 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
“कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजार आहे. हे ....
अधिक वाचा