By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2020 09:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अमरावती
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या पत्रकार परिषदेत चक्क कोरोनाग्रस्त घुसल्याचा विचित्र प्रकार घडला. कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी टोपे अमरावतीत आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला.
कोरोनाबाबत आढावा घेतल्यानंतर आरोग्यमंत्री टोपे यांनी पत्रकार परिषद बोलावली. त्याचवेळी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देताना अचानक 35 वर्षीय कोरोनाग्रस्त पत्रकार परिषदेत शिरला. हा सगळा प्रकार अचानक घडल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. आरोग्यमंत्र्यांसमोरच कोरोनाग्रस्त खुलेआम फिरत असल्याचे बघून सर्वांचीच धांदल उडाली.
आज #अमरावती जिल्ह्यातील #COVID19 चा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर,औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणेजी,स्थानिक लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/y6puiBUYIc
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 25, 2020
मी कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाल्यानंतरही जिल्हा रुग्णालयात दाखल न केल्याचा आरोप रुग्णाने केला. तसेच आरोग्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी त्याने केली. टोपेंना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नसल्याचं तो म्हणाला. तर दुसरीकडे मंत्र्यांसमोरच आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याने अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली.
अमरावतीत कोरोना रुग्णसंख्या
अमरावतीत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसतोय. अमरावतीत कोरोनाचे 12 हजार 182 रुग्ण आढळले आहेत. तर एकूण 8 हजार 858 जण बरे झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात सध्या तीन हजार बाधितांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 244 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या Sushant Singh Rajput मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या सीब....
अधिक वाचा