ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Coronavirus : कोरोनाची वाढती संख्या पहाता पालिका ऍक्शन मोडवर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 20, 2021 06:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Coronavirus : कोरोनाची वाढती संख्या पहाता पालिका ऍक्शन मोडवर

शहर : मुंबई

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus)  पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. डिसेंबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरकारने नवे नियम जाहीर केले आहेत. या नियमांबाबत सरकार कठोर निर्णय घेत आहे.  अंधेरी पश्चिममध्ये 32 हॉटेल ,पब रेस्टॉरंट , मंगलकार्यालयांना नोटीस देण्यात आली आहे.

कोरोनाचे सर्व नियम पाळणं बंधनकारक असेल.  रेस्टॉरंट, पब , मंगलकार्यालय मध्ये होणारी गर्दी टाळावी  याकरता पालिका धडक मोहिम करत आहे. ताकीद देऊन ही कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई आणि आस्थापन सील केली जातील असे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत.

वरळीमध्ये पालिकेच्या कारवाईला वेग आला आहे. रेस्टॉरंट पब वर कारवाई केली जात आहे. रात्री 17 लोकांवर मास्क न घातल्याने कारवाई करण्यात आली आहे. आता कारवाई पालिका वेगाने करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या (Coronavirused increased in Maharashtra)  संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 24 तासांत 6 हजार 112 नवे रुग्ण तर 44 कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. राज्यात परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे कोरोनाचे नियम कठोर केले जात आहेत. मुंबईतही प्रतिबंधित इमारतींचे नियम (Mumbai Building sealed) कठोर केले आहेत.गेल्या  24 तासांत 94 इमारती सील करण्यात आल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे सील केलेल्या इमारतींची संख्या 321वर गेली आहे. सील केलेल्या इमारतीमधील रहिवासी घराबाहेर पडल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मागे

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा दहशतवादी हल्ला, इतके सैनिक ठार
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा दहशतवादी हल्ला, इतके सैनिक ठार

पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान (Balochistan) प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनामुळे राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन?
कोरोनामुळे राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन?

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं थैमान वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही जिल्....

Read more