ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाचं संकट वाढलं,रेल्वेतून प्रवास केलेल्या 12 जण कोरोना पॉझिटिव्ह

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 02:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाचं संकट वाढलं,रेल्वेतून प्रवास केलेल्या 12 जण कोरोना पॉझिटिव्ह

शहर : देश

देशात कोरोनाबाधितांचा आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 297 झाली असून नुकतंच 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील चार कोरोनाबाधितांनी मुंबई ते जबलपूरला एक्सप्रेसमधून प्रवास केला. तर इतर आठ जणांनी दिल्लीतून रामगुंडम या ठिकाणी ट्रेनने प्रवास केला आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 13 मार्च 2020 रोजी AP संपर्क क्रांती एक्सप्रेसने 8 जणांनी दिल्ली ते रामगुंडम या ठिकाणी प्रवास केला होता. या सर्वांचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तर दुसरीकडे गेल्या आठवड्यात दुबईहून भारतात आलेल्या 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या चौघांनी 16 मार्च 2020 रोजी B1 या डब्ब्यातून 11055 गोदान एक्सप्रेसने मुंबई ते जबलपूर असा प्रवास केला होता. या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे.या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळा. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केलं आहे, अशा काही सूचना दिल्या आहेत.

देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा हा शुक्रवारी (20 मार्च) 250 इतका होता. मात्र शनिवारी या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने ही संख्या 297 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली. यात 32 विदेशी रुग्णांचा समावेश असून 17 इटालियन, 3 फिलिपीन्स, 2 ब्रिटेन तर प्रत्येकी एक कॅनडा, इंडोनेशिया आणि सिंगापूरचे रहिवाशी आहेत. तर आतापर्यंत दिल्ली, कर्नाटक, पंजाब आणि महाराष्ट्र या चार राज्यात एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.

दरम्यान देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 63 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पुण्यात 22 तर मुंबईत 21 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

                                                      

मागे

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये ,विनंती करतोय, आताच घरी थांबा, अन्यथा...
तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये ,विनंती करतोय, आताच घरी थांबा, अन्यथा...

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने चार शहरं लॉकडाऊन केली आ....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाचा फैलाव : सोशल मीडियावरुन अफवा पसरवाल तर खबरदार, महाराष्ट्र सायबरचा इशारा
कोरोनाचा फैलाव : सोशल मीडियावरुन अफवा पसरवाल तर खबरदार, महाराष्ट्र सायबरचा इशारा

राज्यात दिवसागणिक कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोन....

Read more