By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 14, 2020 11:26 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. भारतात कोरोनाचे ८२ रूग्ण आहेत, तर राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १८ आहे. शिवाय इटलीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत या धोकादायक विषाणूची लागण १२६६ जणांना झाली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव लक्षात घेता सर्वच राष्ट्रांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
कोरोनाचा सामना करण्यासाठी इटली सरकारने एक अजब फतवा काढला आहे. ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे अढळतील त्या व्यक्तीस १४ दिवस वेगळे राहावे लागणार आहे. जण संशयित रूग्णाने या प्रक्रियेस नकार दिला तर त्याला २१ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते. इटलीमधील सरकारी अधिकाऱ्यांनी असा इशारा दिला आहे.
कोरोना व्हायरसमुळे इटलीतील परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. या व्हायरसमुळे मृतांच्या संख्येतही भर पडत आहे. दरम्यान इटलीमध्ये रूग्णालय आणि मेडिकल वगळता संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. नागरिकांना इतर कोणत्याही कामासाठी बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
शिवाय कोरोना रूग्णामुळे इतर कोणाला धोका निर्माण झाल्यास त्याला सहा ते तीन वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो. या आजाराला आळा घालण्यासाठी आणि संसर्ग थांबवण्यासाठी रूग्णांवरच गुन्हा नोंदवण्याचा अजब निर्णय इटली सरकारने घेतला आहे.
त्याचप्रमाणे एखाद्या कोरोनाग्रस्त रूग्णामुळे वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास त्या व्यक्तीवर 'हेतुपूर्वक खून' केल्याचा आरोप केला जाऊ शकतो. त्यानंतर त्या व्यक्तीला २१ वर्षांची शिक्षा होवू शकते. चीनमध्ये उदयास आलेल्या या व्हायरसने ब्राझील, कॅनडा आणि अमेरिका असे अनेक देशांमध्ये शिरकाव केला.
कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. कोरोनामुळे जगभरात ५,७३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. असं असताना भारतात कोरोनामुळे १० रूग्ण एकदम ठणठणीत झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही आता ८४ पर्यंत पोहोचली आहे.
बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या सहसंस्थापक पदाचा राजीनामा दिला. यापुढे ज....
अधिक वाचा