ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एसीचा वापर कमी करा, आरोग्य मंत्र्यांचा सल्ला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 21, 2020 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एसीचा वापर कमी करा, आरोग्य मंत्र्यांचा सल्ला

शहर : मुंबई

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. काल दिवसभरात तब्बल 11 नवे रुग्ण आढळले असून, राज्यातील बाधितांची संख्या तब्बल 63 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच याबाबतची माहिती दिली. “काल दिवसभरात 11 रुग्ण वाढले. यामध्ये 10 रुग्ण मुंबईचे तर 1 पुण्याचा नवा रुग्ण आढळला आहे. यापैकी तिघांना संपर्क आल्यामुळे तर परदेशातून आलेल्या 8 जणांना लागण झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

आज मी शरद पवारांची भेट घेतली. टेस्टिंग फॅसिलिटी वाढवण्याची गरज असल्याचं त्यांना सांगितलं. शरद पवारही  केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोलले. टेस्टिंग लॅब वाढल्याच पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने सर्व मेडिकल कॉलेजमध्ये टेस्टिंग सुविधा करण्यास तयार आहोत. केंद्रसरकारच्या अखत्यारितील ICMRI त्यांचे नियम 100 टक्के पाळल्या, तरच आम्हाला परवानग्या द्या अशी मागणी हर्षवर्धनना सांगितली. आम्ही सर्व नियम पाळू, पण किट द्या असा आग्रह केला, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

टेस्टिंग लॅब 3 होत्या त्या आता 7 लॅब कार्यरत आहेत. आणखी 12 ते 15 लॅब हव्या. संपर्क करुन ओळखलं पाहिजे की कोण बाधित आहे आणि त्यांना विलगीकरण करुन त्यांची तपासणी करणं आवश्यक आहे. त्यासाठीच टेस्टिंग लॅब आवश्यक असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

हर्षवर्धन यांनी ICMRI चे प्रमुख डॉ अरविंद भार्गव यांना तशा सूचना दिल्या आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. टेस्टिंग किट्स या महत्त्वाच्या आहेत. त्यानेच तपास होतो. त्याची मागणी केली आहे, असं टोपे म्हणाले.

काल मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरमधील दुकाने, कार्यालये बंद केली. इथे जे कामगार, विद्यार्थी, बिझनेसनिमित्त आले होते,ते घरी जात आहेत. त्यामुळे रेल्वेला गर्दी होत आहे, तिकीटासाठी रांगा लागत आहेत. मी रात्री 11.30 वाजता याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. रेल्वे मंत्र्यांना सांगून जाणाऱ्या वर्गाला जाऊ देण्यासाठी रेल्वेंची संख्या वाढवावी लागणार आहे.

याबाबत मुख्यमंत्री आणि पवारांनी मान्य केलंच आहे. जास्त रेल्वे देऊन गर्दी कमी करण्याला प्राधान्य आहे.लोकल ट्रेनच्या बाबतीत हर्षवर्धन यांचं मत आहे की ते बंद करायला हवं. गर्दी कमी होताना दिसत नाही. लोक व्यापार, शिक्षण, कामानिमित्त बाहेर पडतात, मात्र ते बंद केल्यामुळे कमी गर्दी होईल. फक्त आवश्यक सेवाच सुरु आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, औषधे, फायरब्रिगेड, स्वच्छता करणारे, पाणीपुरवठा करणारे इतकेच प्रवास करतील. त्याव्यतिरिक्त गर्दी करु नये. जर गर्दी हटली नाही तर मुंबई लोकल बंद करावीच लागेल, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला.

खबरदारी म्हणून टेस्टिंग किट्स हव्या

 

टेस्टिट किट्स कमी आहेत असं नाही, मात्र जर अचानक आकडा वाढला तर त्यावेळी किट्स अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यावेळी पळापळ नको म्हणून टेस्टिक किटची मागणी केली आहे, असं टोपे म्हणाले.

आपण फेज टू मध्ये

आपण फेज टू मध्येच आहोत. आता 63 पैकी साधारणत: 12-13 लोकांना संसर्गामुळे बाधा झाली. बाकी जो आकडा आहे तो बाहेरुन इन्फेक्शन घेऊन आले आहेत. बाहेरुन आलेले जास्त आहेत. हा आजा आपला देशाची उत्पत्ती नाही, बाहेरुन आलेला आकडा मोठा आहे. त्यांच्यापासून धोका नको म्हणून खबरदारी घेत आहोत, असं टोपे म्हणाले.

एसीचा वापर कमी करा

एसीचा वापर कमी करावा, हा व्हायरस थंड ठिकाणी वाढतो किंवा त्याचं आयुर्मान एसीमध्ये जास्त असतं. एसीमध्ये विषाणू 7-8 तास जगू शकतो.  एसीच्या कोपऱ्यात राहून त्यामार्फत विषाणू संसर्ग वाढू शकतो. एसीऐवजी खिडकी, फॅनचा वापर करा, असं टोपे म्हणाले.

कडक उन्हात विषाणूचं आयुर्मान कमी आहे. एसीमध्ये 7-8 तास तर उन्हात तास-2 तासात विषाणू मरु शकतो. WHO आणि केंद्राच्या निर्देशानुसार नियमावली जारी केली जाते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मागे

हातावर 'क्वारंटाईन'चे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, दोघांना विरारमध्ये उतरवलं!
हातावर 'क्वारंटाईन'चे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, दोघांना विरारमध्ये उतरवलं!

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, अनेकांना य....

अधिक वाचा

पुढे  

दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला
दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्यात  आला ....

Read more