ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाचा धोका वाढला, रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी चार दिवसांवर !

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2020 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाचा धोका वाढला, रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी चार दिवसांवर !

शहर : देश

देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसात दररोज सरासरी १७. टक्के कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमुळे सुरुवातीच्या काळात मिळालेला फायदा आपण गमावू लागल्याचे हे धोतक असल्याचे दिसून येत आहे. निझामुद्दीन मरकज प्रमाणेच देशात अनेक शहरात स्पष्टपणे  Social Distanceच्या नियमांचे सातत्याने होणारं उल्लंघन याला कारणीभूत आहे. आता आपल्याकडे रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी चार दिवसांवर आला आहे.

रुग्णांची संख्या १३ ते १५ मार्च दरम्यान दिल्लीतील निझामुद्दीन मरकजमध्ये झालेल्या तब्लीग जमातमध्येच वाढल्याचं आता पुढे येतंय. १३ ते १५ मार्च म्हणजे बरोबर १५ दिवसांपूर्वी सोशल डिस्तंसिंगचे सगळे निकष धाब्यावर बसवून निझामुद्दीन मरकजमध्ये तब्लिग जमातचा कार्यक्रम झाला. त्यात सुमारे सात हजारापेक्षा जास्त लोक देशाच्या विविध भागातून सामील झाले होते. त्यामुळे आता पंधरा दिवसाचा इन्कुबेशनचा काळ लक्षात घेता देशाच्या बहुतांश भागात मरकजमधून परतलेल्या लोकांमुळे कोरोनाचे किती संक्रमण झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी.

याच काळात देशात लॉकडाऊन असले, तरी लोकांनी ते तितकेसे गांभीर्यानं घेतले नाही. देशभरात केवळ अंदाजे ८५ टक्के जनताच लॉकडाऊनचे पालन करत असल्याचे निदर्शनाला आलं. मजुरांचे पलायन असो की भाजीपाला बाजारातली गर्दी किंवा विनाकारण रस्त्यावर बंद बघण्यासातीची गर्दी. एकूण Social Distanceचं गांभीर्य पाळल्याने भारताने कोरोनाविरोधातल्या युद्धात मिळवलेली आघाडी आता काहीशी गमावलीय की काय, अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आढळून येणाऱ्या रुग्णांमुळे दिसून येत आहे.

 

पुढे  

कोरोना लॉकडाऊन : लातूरमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
कोरोना लॉकडाऊन : लातूरमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त....

Read more