ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Coronavirus: घरातच कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका, बचावासाठी करा 3 उपाय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2020 10:43 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Coronavirus: घरातच कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका, बचावासाठी करा 3 उपाय

शहर : मुंबई

देशात कोरोनाचा (Corona) धोका काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. रोज नव्याने कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. या सगळ्यात कोरोनाच्या लक्षणांमध्येही वारंवार बदल होत गेले. सध्या कोरोना झाल्यानंतर घरातच क्वारंटाईन (Quarantine)होण्याचा सल्ला दिला जातो. पण त्यासाठी आपलं घरंही योग्यरित्या सॅनिटाईझ होणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या संसर्गाचा कुटुंबातील इतरांना धोका होऊ शकतो.

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कोरोना रुग्ण घरातच क्वारंटाईन असेल तर नाही म्हटलं तरी त्याचा कुटुंबाशी संपर्क होतो. बोलताना, मस्ती सुरू असताना आपण मोठ्याने श्वास घेतो आणि त्यातून संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पण यावर घरात आपण कशी काळजी घेतली पाहिजे याच्या काही महत्त्वाच्या सूचना समोर आल्या आहेत.

अमेरिकेची हेल्थ एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोना विषाणूचा प्रसार हा हवेत तरंगणार्‍या लहान विषाणूच्या कणांमधूनही होऊ शकतो. याचं कारण म्हणजे वेंटिलेशनची कमतरता. यामुळे कोरोनातून वाचण्यासाठी घरात चांगलं वातावरण आणि हवा खेळती असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरात शक्य तितक्या वेळी खिडक्या आणि दारं उघडून ठेवण्याचा प्रयत्न करा. घरात स्वच्छता असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पिण्यासाठी गरम पाण्याचा उपयोग करा तर पौष्टिक अन्न खाणंदेखील महत्त्वाचं आहे.

रात्री झोपताना खिडक्या खोलून झोपा

रात्री झोपताना खिडक्या थोड्याफार उघड्या ठेवून झोपण्याचा प्रयत्न करा. यातून घरातली हवा खेळती राहते. इतकंच नाही तर रात्री मानवी हालचाल कमी असल्यामुळे हवा शुद्ध असते. यामुळे घरातील हवेची क्वालिटीदेखील चांगली होते. पण थंडीत मात्र हा उपाय करताना काळजी घेणं आवश्यक आहे, अशी माहिती शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे.

किचन आणि बाथरूममध्ये एक्झॉस्ट पंखा लावा

घरातील हवा सुधारण्यासाठी अनेक उपकरणं बाजारात आहेत. त्याचा चांगला वापर करता येईल. त्यामुळे किचन आणि बाथरूममध्ये एक्झॉस्ट पंखा लावण्याचा प्रयत्न करा.

घरातच्या आत झाडं लावू शकता

घरातील खराब हवेचा चांगली करण्यासाठी तुम्ही वनस्पतींचा वापर करू शकता. खोलीच्या आत ठेवलेली झाडं हवेची गुणवत्ता सुधारण्यात खूप उपयुक्त ठरू शकतात. वनस्पतींमुळे कार्बन डाय ऑक्साईडची पातळी घरातील घातक विषारी पदार्थ कमी करण्यासाठी मदत करतात.

मागे

Coronavirus : आता गुगल मॅपवर पाहता येणार Containment Zones
Coronavirus : आता गुगल मॅपवर पाहता येणार Containment Zones

अनोळखी वाटांवर निघालेल्या अनेकांसाठी मदतीच्या ठरणाऱ्या गुगल मॅप्सची आता ....

अधिक वाचा

पुढे  

ज्यांना मराठी बोलायची लाज वाटत असेल त्यांना आमच्या स्टाईलने शिकवणी देऊ : संदीप देशपांडे
ज्यांना मराठी बोलायची लाज वाटत असेल त्यांना आमच्या स्टाईलने शिकवणी देऊ : संदीप देशपांडे

मराठीत बोलण्याची विनंती केल्याने अपमानास्पद वागणूक देणाऱ्या सराफाविरोधा....

Read more