ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाचा कहर सुरुच, जगभरात अशी भंयकर स्थिती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 11:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाचा कहर सुरुच, जगभरात अशी भंयकर स्थिती

शहर : विदेश

कोरोना व्हायरसने जगभराक 12,592 लोकांचा बळी घेतला आहे. सगळ्यात जास्त मृत्यूचं प्रमाण युरोपमध्ये आहे. येथे 7199 लोकांना याची लागण झाली आहे. आशियामध्ये 3459 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये मागील 24 तासात जवळपास 800 लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये मागील 24 तासात 112 जणांचा मृत्यू झाला आहे.नायजेरियाने 1 महिन्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. कोरोना व्हायरस आता आफ्रिकेत ही पाय पसरु लागल्याने चिंता वाढल्या आहेत. आफ्रिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजाराच्या वर गेली आहे. शनिवारी नायजेरीयाने खबरदारीचा उपाय म्हणून 1 महिन्यासाठी विमानं रद्द केली आहेत. रवांडाने देखील अनावश्यक अशा गोष्टींवर 2 आठवड्यांसाठी बंदी घातली आहेइटलीमध्ये कोरोनामुळे आणीबाणी निर्माण झाली आहे. सर्वाधिक मृत्यूंचं प्रमाण इटलीमध्ये आहे. इटलीमध्ये आणखी 6557 नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 53578 पर्यंत पोहोचली आहे. ज्यापैकी 17708 लोकं रुग्णालयात आहेत. 6072 लोकांना उपचारानंतर सोडण्यात आलं आहे. तर कोरोनामुळे मृत्यांची संख्या 4825 पर्यंत पोहोचली आहे. इटलीमध्ये 2857  जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

इराणमध्ये मृतांचा आकडा 1500 च्या वर गेला आहे, मागील 24 तासात इराणमध्ये आणखी 966 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. इराणमध्ये आतापर्यंत 20610 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनामुळे फिलिपींसमध्ये 73 जणांचा मृत्यू झाला आहे. जगात कोरोनामुळे मृत्यांची संख्या वाढत चालली आहे.

अमेरिकेतही कोरानाची कहर सुरु आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांनी देखील कोरोना टेस्ट करुन घेतली आहे. पेंस यांचा रिपोर्ट नेगेटीव्ह आहे. त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनाचे 208 नवे रुग्ण आढळले आहेत. 24 तासात येथे सात जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 1178 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण 18 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मागे

इटलीमध्ये अडकलेल्या 263 भारतीयांना घेऊन विशेष विमान दिल्लीत दाखल
इटलीमध्ये अडकलेल्या 263 भारतीयांना घेऊन विशेष विमान दिल्लीत दाखल

आज जगावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. अनेक जण वेगवेगळ्या देशांमध्ये फ....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४ वर
महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४ वर

महाराष्ट्रात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे मुंबईत 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग....

Read more