ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वरळीत कोरोनाचे 5 संशयित रुग्ण, कोळीवाडा सील, कुणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 30, 2020 02:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वरळीत कोरोनाचे 5 संशयित रुग्ण, कोळीवाडा सील, कुणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव

शहर : मुंबई

राज्यात कोरोनाने प्रचंड हातपाय पसरले आहेत. मुंबई या संसर्गाचं केंद्र झालं आहे. आता मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे 5 हून अधिक कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे वरळी कोळीवाडा सील करण्यात आला आहे.  मागील 2 दिवसात त्यांना उपचारासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसह पोलिस प्रशासन हायअलर्टवर असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोळीवाड्यात जाण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच कुणाला बाहेरही येऊ दिले जात नाही. या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी देखील युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे.

वरळी कोळावाडा परिसरात काल संशयित रुग्ण आढळल्याने, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रात्रीच हा परिसर सील केला होता. कोणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलं. त्यानंतर महापालिका प्रशासनाने इथे निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेतली.

त्यानंतर सोमवारी (30 मार्च) वरळीतील कोळीवाडा इथे संशयित रुग्णांचा आकडा वाढला. त्यामुळे आधीच बंद केलेल्या कोळीवाड्यात आणखी खबरदारी घेण्यात आली. कोळीवाड हा प्रचंड दाटीवाटीने लोकवस्ती असलेला परिसर आहे. येथे बैठ्या चाळीत नागरिक राहतात. त्यामुळे येथे कोरोनाचा संसर्ग झाल्यास मुंबईवरील कोरोनाचा धोका अनेक पटीने वाढणार आहे. हाच धोका लक्षात घेऊन कोरोना संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिका प्रशासनासह इतर यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

या परिसरात अत्यंत काटेकोरपणे निर्जंतुकीकरण फवारण्या करण्यात येत आहेत. या परिसरात गेलेल्या पोलिसांच्या गाड्यांवरही निर्जंतुकीकरण फवारण्या केल्या जात आहेत.

 

 

 

 

मागे

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
पुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण सर्वात आधी झाली होती. पुण्यात कोरोनाचा ....

अधिक वाचा

पुढे  

देशात कोरोनाबाधितांची संख्या 1000 च्या पार, 24 तासात 106 कोरोना रुग्ण
देशात कोरोनाबाधितांची संख्या 1000 च्या पार, 24 तासात 106 कोरोना रुग्ण

महाराष्ट्रासह देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दर दिवशी प्रत्येक राज....

Read more