ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 30, 2020 05:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी

शहर : विदेश

करोना व्हायरसमुळे युरोपातील अनेक देशात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. अशातच एक धक्काधादाक बातमी समोर आली आहे. स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा यांचे करोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. करोनामुळे राजघराण्यातील व्यक्तीचे निधन होण्याची ही पहिलीच घटना आहे.

मारिया टेरेसा यांचे वय

86 होते. मारिया स्पेनचे राजा फेलिपे सहावे यांची बहिण होत्या. मारिया यांचे भाऊ राजकुमार सिक्टो एनरिक डी बोरबोन यांनी फेसबुकवरून निधनाची माहिती दिली. राजकुमारी मारिया यांचे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये निधन झाले. स्पेनचे राजे फेलिपे यांची करोना व्हायरस संदर्भातील चाचणी नुकतीच घेण्यात आली आणि त्यानंतर मरिया यांच्या निधनाचे वृत्त आले. दिलासा देणारी बाबा म्हणजे फेलिपे यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. 28 जुलै 1933 रोजी जन्मलेल्या राजकुमारी मारिया यांनी त्यांचे शिक्षण फ्रान्समध्ये घेतले होते. त्यानंतर त्या पॅरिस येथील विद्यापिठात प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. आपल्या मुक्त विचारांमुळे मारिया यांची जनसामान्यात ओळख होती. त्या लोकप्रिय देखील होत्या आणि रेड प्रिसेस अशा नावाने त्यांना ओळखले जात असे.

 

मागे

संचारबंदीमुळे दारु नाही, इचलकरंजीत यंत्रमाग कामगाराची आत्महत्या
संचारबंदीमुळे दारु नाही, इचलकरंजीत यंत्रमाग कामगाराची आत्महत्या

संचारबंदीमुळे दारु मिळत नसल्याच्या कारणातून यंत्रमाग कामगाराने आत्महत्य....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाचा राज्यात १०वा बळी, रुग्णांची संख्या २१६ वर
कोरोनाचा राज्यात १०वा बळी, रुग्णांची संख्या २१६ वर

कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात १०वा मृत्यू झाला आहे. ८० वर्षांच्या एका को....

Read more