ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना:विविध पॅथींच्या तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा, हे दिलेत निर्देश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 23, 2020 09:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना:विविध पॅथींच्या तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा, हे दिलेत निर्देश

शहर : मुंबई

कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. त्यानंतर तज्ज्ञांना मार्गदर्शक सूचना तयार करुन टास्क फोर्सकडे द्याव्यात जेणेकरुन एकात्मिक औषधोपचार देऊन रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी बुधावारी राज्यातील विविध पॅथींचे तज्ज्ञ व वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. या संकट काळात आर्युवेद, युनानी यांचे महत्त्व जगाला पटवून देण्याची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुष उपचारासाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, निमा, आय एम ए, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्य शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. आयुषच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी देखील राज्य शासनाने समिती नेमली आहे. उपचारांमध्ये सर्व पॅथी महत्त्वाच्या असून त्यातील औषधांसाठी सर्वांनी मिळून राज्य शासनाला दोन पानी मार्गदर्शक सूचना तयार करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

आयुष मधील औषधांची प्रतिबंधात्मक आणि उपचारासाठी अशा दोन भागात विभागणी करून तज्ज्ञांनी त्या संबंधी उहापोह करावा आणि टास्क फोर्सकडे सर्वसमावेशक सूचना सादर कराव्यात जेणे करुन त्या कोरोना रुग्णांच्या उपचारात उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी सांगितले.

मागे

म्हाडाचा सावधानतेचा इशारा, घर मिळवून देण्याच्या नावे फसवणूक
म्हाडाचा सावधानतेचा इशारा, घर मिळवून देण्याच्या नावे फसवणूक

म्हाडाचे घर मुंबईत असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, घर मिळवून देण्....

अधिक वाचा

पुढे  

नववी-अकरावीत नापास झालेल्यांना पुन्हा संधी, अशी होणार परीक्षा
नववी-अकरावीत नापास झालेल्यांना पुन्हा संधी, अशी होणार परीक्षा

नववी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीमध्य....

Read more