ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Corona Vaccination : १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यात 'यांना' मिळणार लस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 13, 2021 01:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Corona Vaccination : १ मार्चपासून तिसऱ्या टप्प्यात 'यांना' मिळणार लस

शहर : देश

सोमवारपासून खासगी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांन लस देण्यात येणार आहे. १ मार्चपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होतोय. मुंबई महापालिकेने 16 जानेवारीपासून सुरू केलेल्या लसीकरणाचा पहिला आणि दुसरा टप्पा वेगाने सुरू असून आता खासगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी मिळणार आहे. याची सुरुवात येत्या सोमवारपासून होणार असून 20 खासगी रुग्णालयांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईत कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यापासून सर्वसामान्यांचे लसीकरण सुरू होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील ज्येष्ठ आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे.

त्यानंतर 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणाच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. भारताने ८ फेब्रुवारीपर्यंत ३३८ कोटी रुपयांच्या कोरोना लसींची विविध देशांना निर्यात केली आहे. सरकारने ही माहिती राज्यसभेत दिलीय.

निर्यात केलेल्या कोरोना लसींमध्ये मित्र देशांना मदतस्वरूपात दिलेल्या लसींचाही समावेश आहे. देशात कोरोना लसींचा पुरेसा साठा ठेवून मगच बाकीच्या लसींची जानेवारीपासून निर्यात करण्यात येत आहे.

मागे

रेल्वेचीच ! महिला प्रवाशास1 लाख 33 हजारांची भरपाई
रेल्वेचीच ! महिला प्रवाशास1 लाख 33 हजारांची भरपाई

रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर येतेय. रेल्वे प....

अधिक वाचा