By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 19, 2021 09:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येची (Corona Patient) आकडेवारी पुन्हा वाढतेय. लसीकरण अद्याप सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाले नाहीय. असे असतान औरंगाबादमधून (Aurangabad Corona) कोरोनासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येतेय. औरंगाबादेत लस घेतलेल्या 2 डॉक्टरांना (Doctors Corona Possitive) कोरोनाची लागण झालीये.
लस घेतल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झालीये. कोरोना झालेले दोन्ही डॉक्टर्स हे वयस्कर आहेत.
लस घेतल्यामुळे त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकरी नीता पाडळकर यांनी दिलीये. औरंगाबाद मनपा क्षेत्रात 13 हजार कोरोना योध्याना दिली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढली
राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20,81,520 झाली आहे. तर 40,858 रुग्ण अजूनही राज्यात एक्टीव्ह आहेत. राज्यात काल 5427 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 2543 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढ कमी होत होती. पण आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्य़ाने राज्यातील प्रशासन चिंतेत आहे.
सध्या राज्यात 2,16,908 व्यक्ती होमक्वांरटाईन असून 1743 लोकं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.48 टक्के इतका आहे. तर रिकव्हरी रेट 95.5 टक्के झाला आहे.
यवतमाळ आणि अमरावतीमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा कोरोनाचा ....
अधिक वाचा