ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Corona Vaccine | येत्या 73 दिवसात भारतात कोरोना लस, मोफत लसीकरण, ऑक्स्फोर्ड विद्यापिठाचा दावा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2020 01:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Corona Vaccine | येत्या 73 दिवसात भारतात कोरोना लस, मोफत लसीकरण, ऑक्स्फोर्ड विद्यापिठाचा दावा

शहर : मुंबई

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची लस नेमकी कधी येणार याची सर्व नागरिक वाट बघत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्वदेशी बनावटीची कोरोना लस वर्ष अखेरीस येईल, असे ते म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतची माहिती दिली. तर दुसरीकडे पुढील 73 दिवसात भारतात कोरोनाची लस उपलब्ध होईल, असा दावा सीरम आणि ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूटने केला आहे. तसेच ही लस सर्वांना मोफत मिळणार आहे.

भारत बायोटेक या कंपनीने बनवलेल्या Covaxin ही कोरोनाची लस या वर्षाअखेरपर्यंत उपलब्ध होईल. 2021 वर्षाच्या पहिले तीन महिने ही कोरोना लस आपण वापरु शकतो, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी दिली.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जगभरात कोरोना लस निर्मितीवर भर दिला जात आहे. भारतीय कंपनीने बनवलेली कोरोना लस येत्या वर्षाअखेरपर्यंत तयार होऊ शकते. त्यानंतर ही लस परिणामकारक आहे का हे समजू शकेल. तसेच सीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडिया पहिल्यापासूनच ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत एकत्रित कोरोनाची लसीचे उत्पादन करत आहे. जेणेकरुन लवकरात लवकर कोरोना लसीची निर्मिती होईल. तर इतर दोन स्वदेशी लस तयार करण्यासाठी आणि बाजारात येण्यासाठी कमीत कमी एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. या वर्षाअखेरपर्यंत कोरोनाची स्वदेशी लस बाजारात उपलब्ध होण्याची अपेक्षा वर्तवली आहे.”

तीन कोरोना लसीची अपडेट

ऑक्सफर्ड लस –: सीरम इन्स्टिट्यूटने भारता कोरोना लसीची मानवी चाचणी सुरु केली आहे. ही लस वर्षाअखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

कोवॅक्सिन -: हैद्राबादची भारत बायोटेकची कोरोना लसीची चाचणी दोन आठवड्यांपूर्वी सुरु करण्यात आली आहे. ही लसदेखील डिसेंबरपर्यंत येणार आहे.

जायकोव-डी -: जायडस कॅडिला या कोरोना लसची क्लिनिकल चाचणी सुरु केली आहे. काही महिन्यात ही चाचणी केली जाईल.

मागे

देशात कोरोनाचा कहर; रुग्णांची संख्या ३० लाखांवर
देशात कोरोनाचा कहर; रुग्णांची संख्या ३० लाखांवर

कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. ही ....

अधिक वाचा

पुढे  

Arogya Setu Appचं नवं फिचर; कंपन्या घेऊ शकणार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती
Arogya Setu Appचं नवं फिचर; कंपन्या घेऊ शकणार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती

आरोग्य सेतू (Arogya Setu) ऍपमध्ये एक नवं फिचर 'ओपन एपीआय सर्व्हिस' (Open API Service) जोडण्या....

Read more