By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 06:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
औषध कंपनी Zydus Cadila कोरोना वॅक्सिन तयार करण्याच्या प्रक्रियेत वेगाने काम करत आहेत. कंपनीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, कोरोना वॅक्सिन कॅडिटेड ZyCoV-D साठी पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पूर्ण केलं असून ते यशस्वी झालं आहे. दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल 6 ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी
ZyCoV-D या लशीची पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीत हे वॅक्सिन कोरोना रुग्णांसाठी फायदेशीर आणि सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीत वॅक्सिनच्या सुरक्षेची चाचणी करण्यात आली आहे. तसेच मुख्य चाचणीची सुरुवात आता सुरु करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील लशीचं क्लिनिकल ट्रायल 15 जुलै रोजी सुरु करण्यात आलं होतं. कंपनीने 20 दिवसांत पहिलं क्लिनिकल ट्रायल पूर्ण केलं आहे.
दुसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा
Zydus Cadila चे चेअरमन पंकज आर. पटेल यांनी सांगितलं की, चाचणीच्या पहिल्या टप्प्यात कोरोना लशीच्या सुरक्षेची तपासणी करण्यात आली. वॉलेन्टिअर्सला डोस दिल्यानंतर सर्व वॉलेन्टिअर्सना 7 दिवसांपर्यंत 24 तास निरिक्षणं नोंदवली. कोणत्याही वॉलेन्टिअर्सला काहीही समस्या निर्माण झाली नाही. त्यामुळे या वॅक्सिनचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात सुरक्षेसोबतच रोगप्रतिकार शक्ती तपासण्यात येईल. या टप्प्यात वॅक्सिन अँन्टीबॉडी आणि रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यात यशस्वी होणार की, नाही. हे तपासण्यात येणार आहे.
भारत बायोटेकही वॅक्सिनवर काम करत आहे
Zydus Cadila भारताची दुसरी फार्मा कंपनी आहे. जी DCGA पासून वॅक्सिन तयार करत आहे. पहिली कंपनी Bharat Biotech आहे जी COVAXIN वर इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीसोबत काम करत आहे.
मागील 2 दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यातच आता प्रभादेवी येथ....
अधिक वाचा