ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९७; सांगलीत चौघांना लागण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 23, 2020 09:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ९७; सांगलीत चौघांना लागण

शहर : मुंबई

देशभरासह राज्यातही कोरोनाचा कहर वाढतच आहे. मुंबईत पुन्हा कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळले आहेत. तर सांगलीत 4 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात 24 तासांत तब्बल 23 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 97वर पोहचली आहे.

सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील लोक हज यात्रेसाठी गेले होते. त्यांना क्वोरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. या कुटुंबातील चार जणांचे रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आले आहेत.

                        

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 97वर पोहचली आहे. गेल्या तीन दिवसांत कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. शनिवारी राज्यात 12 नवे रुग्ण, रविवारी 10 रुग्ण आणि आज सोमवारी एका दिवसांत नव्या 23 रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत एकूण 41 रुग्ण असून आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुणे 16, पिंपरी-चिंचवड 12, नागपूर, यवतमाळ, कल्याण, नवी मुंबई, सांगलीत 4 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

मागे

आपण निर्णायक टप्प्यावर, मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका : उद्धव ठाकरे
आपण निर्णायक टप्प्यावर, मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आपण कोरोना संसर्गाच्या नि....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना : संचारबंदीला न जुमानता मुंबईकर रस्त्यावर
कोरोना : संचारबंदीला न जुमानता मुंबईकर रस्त्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संचारबंदी जाहीर केल्यानंतरही मुंबईकर वाहनचाल....

Read more