ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाचा राज्यात १०वा बळी, रुग्णांची संख्या २१६ वर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 30, 2020 07:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाचा राज्यात १०वा बळी, रुग्णांची संख्या २१६ वर

शहर : मुंबई

कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात १०वा मृत्यू झाला आहे. ८० वर्षांच्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाने मुंबईच्या खासगी रुग्णालयात प्राण सोडले. महाराष्ट्रातमध्ये आता कोरोनाचे एकूण २१६ रुग्ण झाले आहेत. तर ३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याआधी आज सकाळी पुण्यामध्ये एका ५२ वर्षांच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यातली कोरोनामुळे मृत्यू व्हायची ही पहिलीच घटना आहे.

काल कोरोनामुळे मुंबईच्या केईएम रुग्णालयात एका ४० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला होता. तर बुलडाण्यामध्ये एका ४५ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. कोरोनाचा राज्यातला मुंबई बाहेरचा हा पहिलाच मृत्यू होता.

मुंबईमध्ये कोरोनाचे ९० रुग्ण आहेत, तर पुण्यात ४२, सांगलीमध्ये २५, ठाणे जिल्ह्यात २३, नागपूरमध्ये १६, यवतमाळ , अहमदनगर , सातारा , कोल्हापूर , औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, बुलडाण्यामध्ये प्रत्येकी रुग्ण सापडला आहे.

भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १०७१ पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे २९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ९२ नवे रुग्ण आढळले, तर जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

मागे

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी
स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी

करोना व्हायरसमुळे युरोपातील अनेक देशात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या व�....

अधिक वाचा

पुढे  

केंद्र सरकारने २५ हजार कोटींचे पॅकेज द्यावे - अजित पवार
केंद्र सरकारने २५ हजार कोटींचे पॅकेज द्यावे - अजित पवार

‘कोरोना’चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २५ हजार कोटी�....

Read more