By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2020 12:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क घालून सार्वजनिक ठिकाणी फिरावे अशी सूचना दिली आहे. मात्र अनेक ठिकाणी महाराष्ट्रात मास्कचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे अंधेरी, वांद्रे, भिवंडी या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा मास्कसाठा जप्त केला आहे. मुंबईच्या क्राईम ब्राँच युनिट 9 ने ही कारवाई केली आहे. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे ही घटनास्थळी उपस्थित होते.
मुंबई क्राईम ब्रांचला काही दिवसांपूर्वी मास्कचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रांचने आज (24 मार्च) वरिष्ठ पोलीस अधिकारी महेश देसाई यांनी वांद्रे, अंधेरी, भिवंडी या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले. यावेळी पोलिसांनी गिऱ्हाईक बनून मास्कची होलसेल मागणी केली. या आयडियाद्वारे हा मास्कसाठा जप्त करण्यात आला
यावेळी त्यांनी 25 लाख मास्क आणि सॅनिटायझर जप्त केले. याची किंमत 14 कोटी रुपये इतकी आहे. यावेळी चार आरोपींना अटक केली असून उर्वरीत दोघांना लवकरच अटक करु, असेही अनिल देशमुख म्हणाले.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून अनेक नागरिक मास्क आणि सॅनिटायझर वापरावे असे सांगितले आहे. मात्र काही ठिकाणी मास्कची चढ्या भावाने विक्री होत आहे. तसेच बनावट सॅनिटायझरचीही विक्री केली जात आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाबद्दल खुलासा करणार आहे. दरम्यान देशभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोललं जात
कोरोना विषाणूमुळे देशात भीतीचे वातावरण आहे. देशातील 30 राज्यात लॉकडाऊन आहे, ....
अधिक वाचा