ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाचा देशात आणखी एक बळी, मृतांची संख्या ७ वर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 04:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाचा देशात आणखी एक बळी, मृतांची संख्या ७ वर

शहर : देश

कोरोना व्हायरसमुळे भारतात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या सुरतमध्ये एका ६९ वर्षांच्या माणसाचं निधन झालं आहे. बडोद्याच्या रुग्णालयातही एका ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे, पण या महिलेचे कोरोनाचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. गुजरातच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोनामुळे भारतामध्ये झालेला हा ७वा मृत्यू आहे. त्याआधी आज मुंबईमध्ये एका खासगी रुग्णालयात ६३ वर्षांच्या व्यक्तीने प्राण सोडले. या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या रुग्णाला मधूमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असे आजार होते.

तर बिहारमध्येही कोरोनामुळे आजच आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. ३८ वर्षांच्या एका व्यक्तीचं पटनाच्या एम्समध्ये निधन झालं आहे. ही व्यक्ती बिहारच्या मुंगेरमध्ये राहणारी होती. काही दिवसांपूर्वीच हा इसम कतारवरुन परतला होता.

कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये भारतात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. यानंतर मुंबईत एका पुरुषाला तर दिल्लीत एका महिलेला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. कलबुर्गी, मुंबई आणि दिल्लीत मृत्यू झालेले रुग्ण हे वयोवृद्ध होते.

                                                    

मागे

देशात एकही रेल्वे धावणार नाही, रेल्वे सेवा आज मध्यरात्रीपासून बंद
देशात एकही रेल्वे धावणार नाही, रेल्वे सेवा आज मध्यरात्रीपासून बंद

देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. देशात कोरोना विषाणूचा धोका....

अधिक वाचा

पुढे  

जमावबंदी ते लॉक डाऊन, मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या 9 घोषणा
जमावबंदी ते लॉक डाऊन, मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या 9 घोषणा

देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. या विषाणूशी दोन हात करण्यासाठी राज्....

Read more