By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 30, 2020 02:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रासह देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दर दिवशी प्रत्येक राज्यात नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहे. त्यामुळे भारतात कोरोनाबाधितांची संख्या 1000 च्या वर गेली आहे. तर देशातील मृतांची संख्या ही 26 झाली आहे.
देशात लॉकडाऊनचा आज पाचवा दिवस आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशातील जनतेची माफी मागितली.
Till now there have been 979 #COVID19 confirmed cases in the country, including 25 deaths. In the last 24 hours, 106 new positive cases & 6 deaths have been reported: Lav Aggarwal, Joint Secretary, Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/2lkuGBLode
— ANI (@ANI) March 29, 2020
देशात आतापर्यंत 1 हजार 037 लोक कोरोनबाधित झाले आहेत. तर आतापर्यत 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आणि केरळमध्ये आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 193 लोकांना कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.
तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यत 979 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या 24 तासात 106 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाने प्रचंड हातपाय पसरले आहेत. मुंबई या संसर्गाचं केंद्र झालं ....
अधिक वाचा