By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 10, 2020 06:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
टोकियो : समुद्रात असलेल्या एका क्रूझवर करोनाची लागण झाल्याने ३५०० प्रवसांपैकी यातील १३० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची लागण तपसादरम्यान व्यक्त करण्यात आली आहे. 'डायमंड प्रिंसेज' क्रूझवर ही घटना घडली आहे. ही क्रूझ काही-दिवस भर समुद्रात थांबविण्यात आली आहे. तसेच या क्रूझवर काही भारतीय नागरिक असल्याचीही माहिती समोर आली आहे.
जपानच्या या क्रूझवर करोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याची माहिती क्रूझवर असलेल्या डॉक्टरांनी सांगितले आहे. जपानमधील वृत्तमाध्यमांनी याची पुष्टी केली आहे. जपानच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे. करोना व्हायरसग्रस्त क्रूझ सध्या जपानच्या योकोहामा किनाऱ्यावर आहे. क्रूझमध्ये ३५०० प्रवासी असून यात सहा प्रवासी भारतीय आहेत. क्रूझच्या कर्मचाऱ्यांमध्येही काही भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती जपानमधील भारतीय दूतावासाने दिली आहे. तर या क्रूझमध्ये २१ जपानी, पाच ऑस्ट्रेलियन आणि पाच कॅनेडियन नागरिकांचा समावेश असल्याचे म्हटले होते.
मुंबई : प्रदीर्घ काळ संघर्ष केल्यानंतर गिरणी कामगार किंवा त....
अधिक वाचा