By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आगामी पंधरवडा खूप महत्त्वाचा आहे. कोरोनाचे संक्रमण नियंत्रित ठेवण्यासाठी कुठेही गर्दी होऊ न देणे हे आमचे प्रमुख लक्ष्य आहे. त्यासाठी लोकांना अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास शहरे ‘लॉक डाऊन’ करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला.
शहरे लॉक डाऊन करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहेच. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हा विषय आला. मात्र, अशा परिस्थितीत हातावर पोट असलेल्या लोकांची काय परिस्थिती होईल, याची सरकारला जाणीव आहे. पण, त्याच वेळी कोरोनाचे संक्रमण हा त्यापेक्षाही गंभीर मुद्दा आहे. अशा वेळी सरकारचे प्राधान्य कुठल्याही परिस्थितीत संक्रमण वाढू न देण्याकडे असेल. त्यामुळे कुठेही गर्दी न करता आवश्यक तेवढेच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले जात आहे. शासकीय कार्यालयांतील उपस्थितीही जेमतेम ५० टक्के राहील, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर टाळण्याचे आवाहन केले जात आहे. संक्रमणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांकडून प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. नागरिकांकडून प्रतिसाद न मिळाल्यास लॉक डाऊनला पर्याय राहणार नाही. अशा वेळी मुंबई, मुंबईची उपनगरे, ठाणे, पुणे, नागपूर यांसारखी मोठी शहरे पहिल्याच टप्प्यात बंद करावी लागतील, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.
व्हिडिओ कॉन्फरन्सवर भर
कैद्यांना मोठ्या संख्येने न्यायालयात नेण्याची, आणण्याची व्यवस्था करावी लागते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कैद्यांची वाहतूक टाळण्याच्या व जास्तीत जास्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (19 मार्च) रात्री 8 वाजेच्या सुमारास देशातील नागरिक....
अधिक वाचा