By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 23, 2020 05:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही सरकारने जमावबंदी लागू केली. १४४ कलम लागू असतानाही नाशिकच्या डब्ल्यूएनएस कंपनीत दोन हजार कर्मचारी काम करत होते. त्यामुळे या बीपीओ आयटी कंपनीवर सरकारवाडा पोलिसांनी कारवाई केली आहे. साथ रोग नियंत्रण कायद्याअंतर्गत या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कंपन्यांनी वर्क फ्रॉम सुविधा सुरु करावी, तसंच अर्ध्या कर्मचाऱ्यांवर काम करावं, असं आवाहन वारंवार करण्यात येत होतं. यानंतर राज्य सरकारने जमावबंदीही लागू केली. आता मात्र राज्यव्यापी कर्फ्यू लागू करत असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.
देशातली रेल्वेसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. तसंच राज्यातील एसटी सेवादेखील बंद करण्यात आली आहे. लोकं ऐकत नसल्यामुळे राज्यव्यापी कर्फ्यू लावण्यात मजबूर असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संचारबंदी लागू केली आहे. तसेच जि....
अधिक वाचा