ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यात आयटी सेक्टरमध्ये १०० टक्के वर्क फ्रॉम होमची अंलमबजावणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 10:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात आयटी सेक्टरमध्ये १०० टक्के वर्क फ्रॉम होमची अंलमबजावणी

शहर : पुणे

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. पुण्यातील दोन दाम्पत्याच्या मार्फत कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात प्रवेश केला. पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत ११ कोरोना व्हायरस रूग्ण सापडले आहेत तर पुण्यात आतापर्यंत ८ कोरोना व्हायरसग्रस्त रूग्ण सापडले आहेत. पुणे पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्यात कोरोना व्हायरसचा धोका आणखी वाढू नये यासाठी आज आयटी सेक्टरमध्ये १०० टक्के वर्क फ्रॉम होमची अंलमबजावणी होणार आहे.

पुण्यात आजपासून आय टी सेक्टरमधे वर्क फ्रॉम होम ची १००  टक्के अंमलबजावणी होणार आहे. आय टी कंपन्यांमधे पोलीस पाठवून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जेणेकरून कोरोनाचा प्रादूर्भाव होणार नाही. मॅन्युफॅक्चरींग सेक्टरमधे वर्क फ्रॉम होम किती ठिकाणी राबवता येईल याबद्दल जिल्हाधिकार्यांनी कामगार आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. उद्या तो अहवाल आला की त्यावरही निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत आय टी सेक्टरमधे वर्क फ्रॉम होम राबवण्यात यावं यासाठी सुचना दिल्या जात होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती.  आता सरकारी यंत्रणा अंमलबजावणी करणार आहेत.

आयटी सेक्टरमध्ये ३ लाखहून अधिक लोकं काम करतात. सरकारने ५० टक्के कर्मचारी कार्यालयात आणि इतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम असा निर्णय घेतला आहे. मात्र पुण्यात १०० टक्के वर्क फ्रॉम होमसाठी आग्रही आहे. देशभरात ४५ लाख आयटी क्षेत्रातील कर्मचारी आहेत. त्यातील ३ लाख कर्मचारी हे फक्त पुण्यात आहेत. असं असताना कर्मचारी घरून काम न करता कार्यालयात येत असतात. कोरोनाच्या दृष्टीकोनातून ही धोक्याची बाब आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र आहे. तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये म्हणून ठाकरे सरकार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे योग्य ती खबरदारी घेतली आहेत. या नियमांच पालन आयटी कंपन्यांकडून पाळलं नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आयपीसी कलम १८८ अंतर्गत दंड अथवा सहा महिन्यांचा तुरूंगवास अथवा दोन्ही कारवाई करण्यात येणार आहे.

मागे

कोरोना : ठाकरे सरकारच्या १० महत्वाच्या निर्णयांची आजपासून अंमलबजावणी
कोरोना : ठाकरे सरकारच्या १० महत्वाच्या निर्णयांची आजपासून अंमलबजावणी

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात रुग्णांची संख्या ४५ वर गेल....

अधिक वाचा

पुढे  

Coronavirus : सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलली
Coronavirus : सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलली

कोरोनाचं थैमान काही थांबायचं नाव घेत नाही. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म....

Read more