By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 23, 2020 10:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मुंबईत आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या ही तीनवर तर राज्यातील संख्या ही आठवर पोहोचली आहे. ६८ वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. फिलिपींसचा नागरिक असलेल्या या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित लोकांची संख्या ही ८९ वर पोहोचली आहे. आज १५ नवे रूग्ण राज्यात सापडले आहेत.
मृत व्यक्ती फिलीपाईन्स देशाचा नागरिक होता. १० जणांचा ग्रूप नवी मुंबईत त्या देशातून आला होता. त्यापैकी ४ जणांना कोरोनाची लागण झाली होती. सर्व जणांना कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या ४ दिवसांपासून त्यांची स्तिती गंभीर असल्याने त्याला व्हेंटीलेटर वर ठेवण्यात आले होते. इतर ३ जणांवर अजून कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मधुमेह व अस्थमाचाही त्रास या व्यक्तीला असल्याचं समोर आलं आहे.
The total number of positive Coronavirus cases in Maharashtra rises to 89: Maharashtra Health Department pic.twitter.com/XeETk5sTXf
— ANI (@ANI) March 23, 2020
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. आता महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण ८९ रुग्ण झाले आहेत. तर देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४१५ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे नवे १५ रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये मुंबईत १४ तर पुण्यात एक रुग्ण आढळला आहे.
भारतात आतापर्यंत कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ४१२ कोरोनाबाधित रूग्ण देशभरात सापडले आहेत. कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
देशात सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. या धोक....
अधिक वाचा