ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Coronavirus : मुंबईत प्रतिबंधित इमारतींचे नियम कठोर; 24 तासांत 94 इमारती सील

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 20, 2021 10:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Coronavirus : मुंबईत प्रतिबंधित इमारतींचे नियम कठोर; 24 तासांत 94 इमारती सील

शहर : मुंबई

राज्यात कोरोनाबाधितांच्या (Coronavirused increased in Maharashtra)  संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 24 तासांत 6 हजार 112 नवे रुग्ण तर 44 कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. राज्यात परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे कोरोनाचे नियम कठोर केले जात आहेत. मुंबईतही प्रतिबंधित इमारतींचे नियम (Mumbai Building sealed) कठोर केले आहेत.

गेल्या  24 तासांत 94 इमारती सील करण्यात आल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे सील केलेल्या इमारतींची संख्या 321वर गेली आहे. सील केलेल्या इमारतीमधील रहिवासी घराबाहेर पडल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Coronavirus : 94 Buildings Sealed in 24 hours for increase in Mumbai corona patients)

राज्यात शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे राज्यात शुक्रवारी कोरोनाचे हजार 112 नवे रुग्ण आढळले. गेल्या डिसेंबरनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाचदिवशी झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. तर दिवसभरात ४४ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. राज्यभरात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 44 हजार 765 वर पोहोचली आहे. त्यामध्ये मुंबईतील 5162, पुण्यातील 5226 रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी दिवसभरात 2 हजार 159 रुग्ण बरे होऊन घरी गेले..

16 फेब्रुवारीपासून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दररोज सुमारे एक हजारने वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढे पाच बाधित रुग्ण आढळले तरी संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. इमारत सील केल्यानंतरही काही रहिवासी घराबाहेर जात असल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईतील तब्बल ९४ इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत आता ३२१ इमारती सील आहेत. इमारतींमधील रहिवाशांना पुढील १४ दिवस इमारतींबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

मागे

एका रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा; राजेश टोपे यांचे आदेश
एका रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा; राजेश टोपे यांचे आदेश

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकार पुन्हा एकदा अॅक....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनामुळे पंढरपूरची माघी वारीही रद्द, 10 गावांत संचारबंदी
कोरोनामुळे पंढरपूरची माघी वारीही रद्द, 10 गावांत संचारबंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता आषाढवारीनंतर पंढरपूरची (Pandharpur Maghi Wari)  ....

Read more